ठाण्यात तरुणाला गमावावा लागला हात

By Admin | Updated: May 18, 2016 03:15 IST2016-05-18T03:15:13+5:302016-05-18T03:15:13+5:30

पत्नीला प्रसुतीसाठी घेऊन गेलेल्या एका तरु णास हात लिफ्टमध्ये अडकल्याने तो गमावण्याची वेळ त्याच्यावर आली

The man in Thane has lost his life | ठाण्यात तरुणाला गमावावा लागला हात

ठाण्यात तरुणाला गमावावा लागला हात


ठाणे : आधीच प्रसुती दरम्यान बाळ दगावल्याच्या आणि डॉक्टरांची कमतरता असलेले कोपरीतील लखमीचंद फतीचंद हे प्रसुतीगृह चर्चेत आहे. असे असतांना या रुग्णालयात पत्नीला प्रसुतीसाठी घेऊन गेलेल्या एका तरु णास हात लिफ्टमध्ये अडकल्याने तो गमावण्याची वेळ त्याच्यावर आली आहे. यामुळे रुग्णालयाची कुचकामी सुरक्षा आणि प्रशासनाचा हलगर्जीपणा समोर आला आहे.
संदेश गुफ्ता (२९) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांने आपल्या पत्नीला प्रसुतीसाठी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर ते तळमजल्यावर गेले असता तेथे त्यांचा लिफ्टमध्ये उजवा हात अडकला. बऱ्याच प्रयत्नानंतर अखेर त्यांचा हात तोडून त्यांना बाहेर काढण्यात यश आले. या प्रकारानंतर या रुग्णालयातील योग्य सुविधाअभावी संदेशला खासगी रुग्णालयात हलवाले लागले. हा प्रकार स्थानिकांच्या लक्षात आल्यानंतर रुग्णालयाच्या कारभाराबाबत त्यांनी रोष व्यक्त केला.
दरम्यान, गुप्ता यांना पालिकेत नोकरी देण्याबरोबरच उच्चस्तरीय चौकशी करणार असल्याचे नगरसेवक नरेश म्हस्के यांनी सांगितले. तर त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: The man in Thane has lost his life