माण-खटाव.. सत्ताधारी हटाव--रामदास आठवले :

By Admin | Updated: October 10, 2014 23:02 IST2014-10-10T22:06:52+5:302014-10-10T23:02:53+5:30

म्हसवड येथे शेखर गोरे यांच्या प्रचारसभेत काव्यातून विरोधकांवर खरपूस टीका

Man-Khatava .. Powerful Removal - Ramdas Athavale: | माण-खटाव.. सत्ताधारी हटाव--रामदास आठवले :

माण-खटाव.. सत्ताधारी हटाव--रामदास आठवले :

हसवड : ‘कोण आहे माण-खटावचा किंगमेकर? तो आहे गोरे शेखर! तुमच्या मतदारसंघाचे नाव आहे माण-खटाव, ताबडतोब जयकुमार गोरेंना हटाव!’ अशा खुमासदार कविता सादर करून ‘रिपाइं’चे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी विरोधकांवर खरपूस टीका केली. म्हसवड येथे महायुतीच्या राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार शेखर गोरे यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी रासपचे अध्यक्ष महादेव जानकर, शेखर गोरे, माजी आ. दिलीप येळगावकर, माजी नगराध्यक्ष विलास माने, माजी उपनगराध्यक्ष महादेव मासाळ, नगरसेविका धनश्रीदेवी राजेमाने, दीपाली काळे, तुषार वीरकर, दशरथ राऊत, बजरंग खटके, पुंडलिक काळे, दिलीप तुपे, सुरेखा पखाले, सोनल गोरे, उज्ज्वला हाके, महादेव कापसे, नानासाहेब दोलताडे, शिवाजीराव महानवर, डॉ. प्रमोद गावडे, युवराज बनगर, बाळासाहेब मासाळ, मामूशेठ वीरकर उपस्थित होते. आठवले म्हणाले, ‘मागील निवडणुकीत जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण न करता आल्यामुळे स्वत:च्या भावाच्या विरोधात शेखर गोरेंनी विधानसभेच्या मैदानात दंड थोपटले आहेत. शेतीपाणी, बेरोजगारी, महिलांचे प्रश्न, धनगर आरक्षण अशा प्रश्नांसाठी जनतेने शेखर गोरेंच्या पाठीशी राहावे,’ असे आवाहन केले. महादेव जानकर म्हणाले, ‘धनगर आरक्षणाला विरोध करत दोन्ही काँग्रेस पक्षांनी त्यांच्या मतांवर सत्ता उपभोगत स्वार्थ साधला आहे. तसेच दुष्काळी माण-खटावला कायम भकास ठेवण्याचे पाप केले. असले लबाड आणि ढोंगी शासन राज्यात पुन्हा सत्तेत येऊ देऊ नका. दोन्ही काँग्रेसला राज्यातून हद्दपार करण्यासाठी महायुतीच्या विकासात्मक दृष्टीच्या उमेदवाराच्या पाठीशी राहा.’ शेखर गोरे म्हणाले, ‘खोटी आश्वासने देणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधात मी उभा आहे. ज्यावेळी माण-खटावच्या जनतेला प्यायला पाणी नव्हते, त्यावेळी लोकप्रतिनिधी आपल्या बंगल्यावरील जलतरण तलावात पोहत होते.’ यावेळी दिलीप येळगावकर यांनीही विरोधकांवर टीकेची झोड उठविली. (प्रतिनिधी) कवितांना शिट्ट्यांची दाद ‘म्हसवडमध्ये आलो आहे महादेव जानकर आणि तुमचा मित्र होण्यासाठी व शेखर गोरेंना निवडून देण्यासाठी, मी जात आहे राष्ट्रवादी, काँग्रेसचा बदला घेण्यासाठी. दिल्लीला जात आहे तुमच्या पाण्यासाठी.’ खासदार आठवले यांनी सभेत खुमासदारपणे सादर केलेल्या अशा कवितांवर उपस्थितांनी टाळ्या व शिट्ट्या वाजवून दाद दिली.

Web Title: Man-Khatava .. Powerful Removal - Ramdas Athavale:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.