पंढरपूर : चंद्रभागेच्या वाळवंटात स्वत:ला गाडून घेऊन ‘गो कोरोना गो’ म्हणण्याचा असा लक्षवेधी प्रकार महर्षी वाल्मिकी संघाचे अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी चैत्री एकादशी दिवशी केला आहे. ज्या चंद्रभागेच्या वाळवंटात चैत्री एकादशी दिवशी साधुसंतांचा भव्य मेळा भरलेला असतो, हरिनामाच्या जयघोषात आणि टाळ-मृदंगाच्या निनादाने अवघी पंढरी नगरी दुमदुमुन गेलेली असते, तिथे स्वत:ला गाडून घेत अंकुशराव यांनी विठ्ठलाला साकडे घातले. इतिहासात प्रथमच चैत्री एकादशीच्या दिवशी पंढरीत वारी भरलेली नाही. त्यामुळे चंद्रभागा नदीचे पात्र व वाळवंट रिकामे होते.
VIDEO: चंद्रभागेच्या वाळवंटात स्वत:ला गाडून ‘ते’ म्हणताहेत गो कोरोना गो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2020 22:42 IST