जाब विचारला म्हणून मामावर वार
By Admin | Updated: November 28, 2015 02:06 IST2015-11-28T02:06:50+5:302015-11-28T02:06:50+5:30
भाचीकडे वाईट नजरेने पाहणाऱ्यांना जाब विचारणाऱ्या मामावर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना भानुसागर टॉकीजसमोरील पदपथावर गुरुवारी रात्री ९ च्या सुमारास घडली.

जाब विचारला म्हणून मामावर वार
कल्याण : भाचीकडे वाईट नजरेने पाहणाऱ्यांना जाब विचारणाऱ्या मामावर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना भानुसागर टॉकीजसमोरील पदपथावर गुरुवारी रात्री ९ च्या सुमारास घडली. याप्रकरणी तीन अनोळखी व्यक्तींविरोधात एमएफसी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे.
भंगार वेचण्याचा व्यवसाय करणारे मुकेश वानराशी हे त्यांची बहीण, तिच्या मुली व मेहुणा असे एकत्रित पदपथावर जेवण करीत होते. त्यांची सात वर्षांची भाची त्यांच्या बाजूला झोपली होती. या वेळी त्या ठिकाणी तीन अनोळखी व्यक्ती तेथे येऊन झोपलेल्या चिमुरडीकडे वाईट नजरेने पाहू लागले. याचा जाब मुकेशने तिघांना विचारला असता यातील एकाने त्याच्या पोटावर चाकूने वार केला. या वेळी या तिघांनी तेथे उपस्थित असलेल्या अन्य एकावरदेखील वार केला. (प्रतिनिधी)