शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

Mamata Banerjee, Uddhav Thackeray Meet: ममता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटू शकणार नाहीत; शरद पवारांना भेटून माघारी परतणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2021 14:02 IST

Mamata Banerjee, Uddhav Thackeray Meeting: ममता 1 डिसेंबरला मुंबईतील उद्योजकांशी चर्चा करू शकतात. पीटीआयनुसार ममता बॅनर्जी या उद्योजकांना पश्चिम बंगालमध्ये गुंतवणूक वाढविण्याचे आवाहन करणार आहेत.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आजपासून दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आल्या आहेत. या दौऱ्यात त्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार होत्या. देशात काँग्रेसच्या नेतृत्वातील विरोधकांची मोट बांधण्यास ममतांचा विरोध आहे. ममता वेगळी चूल मांडण्याच्या तयारीला लागल्या आहेत. नुकत्याच झालेल्या काँग्रेसने बोलविलेल्या विरोधकांच्या बैठकीला तृणमूल काँग्रेसने हजेरी लावली नव्हती. 

ममता 1 डिसेंबरला मुंबईतील उद्योजकांशी चर्चा करू शकतात. पीटीआयनुसार ममता बॅनर्जी या उद्योजकांना पश्चिम बंगालमध्ये गुंतवणूक वाढविण्याचे आवाहन करणार आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आहे. यामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवागी काँग्रेस हे पक्ष आहेत. यामुळे ममता काँग्रेस सोडून राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची तब्येत बरी नसल्याने ममता यांना ते भेटणार नाहीएत. यामुळे शिवसेना खासदार संजय राऊत आणि मंत्री आदित्य ठाकरे ममता यांची आज सायंकाळी भेट घेणार आहेत. यामुळे ममतांना फक्त शरद पवार यांचीच भेट घेऊन माघारी परतावे लागणार आहे. 

कसा असेल दौरा..पुढील वर्षी एप्रिल महिन्यात बंगालमध्ये जागतिक व्यापार परिषद भरविण्यात येणार आहे. या परिषदेत अधिकाधिक उद्योजकांनी सहभागी व्हावे, यासाठी प्रयत्न करणार आहेत. मंगळवारी सायंकाळी मुंबईत दाखल झाल्यानंतर सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी जाणार आहेत. या दौऱ्यात शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नाच्या स्वागत सोहळ्यालाही उपस्थित राहतील. बुधवारी मुंबईतील उद्योगपतींशी भेटीचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. त्यानंतर शरद पवार यांची भेट घेऊन गुरुवारी कोलकात्याला परतणार आहेत.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारcongressकाँग्रेस