गोवंडीत भाचीवर मामाचा बलात्कार

By Admin | Updated: August 3, 2014 01:48 IST2014-08-03T01:48:21+5:302014-08-03T01:48:21+5:30

घरात कोणी नसल्याची संधी साधत चुलत मामानेच 14 वर्षाच्या भाचीवर बलात्कार केल्याची घटना गोवंडी परिसरात घडली आहे.

Mama's rape on Gawandit Bhachi | गोवंडीत भाचीवर मामाचा बलात्कार

गोवंडीत भाचीवर मामाचा बलात्कार

मुंबई : घरात कोणी नसल्याची संधी साधत चुलत मामानेच 14 वर्षाच्या भाचीवर बलात्कार केल्याची घटना गोवंडी परिसरात घडली आहे. मुलगी गरोदर राहिल्याने हा गुन्हा उघड झाला असून आरोपी मामाविरोधात शिवाजी नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरु केला आहे.
ही मुलगी तिच्या आई-वडिलांसोबत राहते. याच घरात आरोपी भाळू प्रजापती (25) हाही राहात होता. मुलीच्या आई-वडीलांचा भाजी विक्रीचा व्यवसाय असल्याने दिवसभर दोघेही घराबाहेर असायचे. ही संधी साधत आरोपीने अनेकदा या मुलीचा विनयभंग केला होता. सातेक महिन्यांपूर्वी त्याने तिच्यावर बलात्कार केला. शिवाय तिला जिवे मारण्याची धमकी दिली. भीतीपोटी मुलीने ही बाब सांगितली नाही. मात्र शुक्रवारी रात्री अचानक या मुलीच्या पोटात दुखू लागले. तेव्हा ती गरोदर असल्याचे स्पष्ट झाले. पालकांनी  चौकशी केली असता तिने हा प्रकार सांगितला.  (प्रतिनिधी)

 

Web Title: Mama's rape on Gawandit Bhachi