कल्पना गिरी खून प्रकरणी मामा-भाचे अखेर न्यायालयात शरण
By Admin | Updated: March 24, 2015 01:46 IST2015-03-24T01:46:38+5:302015-03-24T01:46:38+5:30
लातूर शहर युवक काँग्रेसच्या सचिव कल्पना गिरी खून प्रकरणात्ील सहआरोपी नगरसेवक विक्रमसिंह चौहाण व कुलदिपसिंग ठाकूर ही मामा - भाचे सोमवारी लातूर न्यायालयास शरण आले.

कल्पना गिरी खून प्रकरणी मामा-भाचे अखेर न्यायालयात शरण
लातूर : लातूर शहर युवक काँग्रेसच्या सचिव कल्पना गिरी खून प्रकरणात्ील सहआरोपी नगरसेवक विक्रमसिंह चौहाण व कुलदिपसिंग ठाकूर ही मामा - भाचे सोमवारी लातूर न्यायालयास शरण आले. ऐन लोकसभेच्या तोंडावर गाजलेल्या या खून खटल्यातील हे आरोपी गेल्या वर्षभरापासून फरार होते़ येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दोघांनाही १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. देशभर गाजत असलेल्या या खून प्रकरणात मुख्य आरोपींना लागलीच अटक करण्यात आली होती़ यापूर्वी चौघेजण अटकेत आहे. यात विक्रमसिंह चौहान यांचे चिरंजीव महेंद्र चौहान, समीर किल्लारीकर, प्रभाकर शेट्टी व श्रीरंग ठाकूर यांचा समावेश आहे. दोघांनाही न्यायालयाने १४ दिवसांची कोठडी सुनावली़ (प्रतिनिधी)