मालवणीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार, हत्या प्रकरणी एकाला अटक
By Admin | Updated: July 6, 2016 16:28 IST2016-07-06T16:28:34+5:302016-07-06T16:28:34+5:30
मालवणीत चंचल सिंग या सात वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

मालवणीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार, हत्या प्रकरणी एकाला अटक
>- एकाला मालवणी पोलिसांकडून अटक
- डीएनए रिपोर्ट ने केला खुलासा
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 6 - मालवणीत चंचल सिंग या सात वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. सनी असे अटक करण्यात आलेल्या या आरोपीचे नाव असुन त्याचा डीएनए या मयत मुलीच्या संदर्भात गोळा केलेल्या गोष्टींशी जुळल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यानुसार त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. तो मालवणीतील पटेलवाडी तबेल्यात काम करतो. २४ मे रोजी म्हणजेच सोमवारी उशिरा रात्री या मुलीचा मृतदेह पटेलवाडी परिसरात झुडपात सापडला होता. त्यानुसार मलावणी पोलीस आणि क्राईम ब्रांच देखील याच्या मागावर होते. डीएनए रिपोर्टमुळे सनी हाच या क्रूर कृत्यामागे असल्याची खात्री पोलीसांची पटली व त्यांनी सनीला अटक केले आहे.