माळवी आज राजीनामा देणार?

By Admin | Updated: February 9, 2015 05:09 IST2015-02-09T05:09:34+5:302015-02-09T05:09:34+5:30

: महापालिकेच्या सोमवारी होणाऱ्या सभेत महापौर तृप्ती माळवी राजीनामा देतात की नाही, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Malvi resigns today? | माळवी आज राजीनामा देणार?

माळवी आज राजीनामा देणार?

कोल्हापूर : महापालिकेच्या सोमवारी होणाऱ्या सभेत महापौर तृप्ती माळवी राजीनामा देतात की नाही, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. लाचखोरीच्या संशयात अडकलेल्या माळवी यांनी गुरुवारी महापौरपदाचा तूर्त राजीनामा देणार नसल्याचे विधान केले आहे. त्यांनी राजीनामा न दिल्यास सभागृहास त्यांच्याविरोधात काहीही कारवाई करता येणार नाही.
राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी महापौर राजीनामा देणार असल्याचे संकेत दिले असले तरी राष्ट्रवादीतील एक गट माळवींनी राजीनामा देऊ नये, यासाठी सक्रिय झाला आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीतील समझोत्याप्रमाणे माळवी यांची सहा महिन्यांची मुदत या आठवड्यात संपत आहे. यामुळे पुढील दहा महिन्यांसाठी काँग्रेसचा महापौर होईल. (प्रतिनिधी)

Web Title: Malvi resigns today?