मालवण ‘रणजी’साठी योग्य
By Admin | Updated: December 31, 2014 23:58 IST2014-12-31T23:24:02+5:302014-12-31T23:58:03+5:30
अजित वाडेकर : मालवणात पत्रकारांशी साधला संवाद

मालवण ‘रणजी’साठी योग्य
मालवण : मालवण येथील बोर्डिंग मैदान उत्तम आहे. या मैदानाचे आऊटफिल्डही चांगले आहे. मैदानाची खेळपट्टी क्रिकेटला पोषक असल्याने या मैदानावर रणजी क्रिकेटचे सामने खेळविले जाऊ शकतात, असे मत भारतीय क्रिकेट मंडळाचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांनी व्यक्त केले. सौ. लक्ष्मीबाई नारायण साटम स्पोटर््स अॅण्ड एज्युकेशन ट्रस्टने आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्तराच्या अपंग टष्ट्वेंटी-२0 क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने वाडेकर हे मालवण येथे आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ते म्हणाले, अपंगांच्या राष्ट्रीय स्तरावरील टष्ट्वेंटी-२0 स्पर्धेमुळे अनेक खेळाडूंना मालवण येथे क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली. या स्पर्धेच्या आयोजनाचा फायदा मालवणला होणारच आहे. फिजिकल चॅलेंज असोसिएशनच्या माध्यमातून गेली २५ वर्षे आम्ही अपंग क्रिकेटपटूंसाठी मेहनत घेत आहोत. मात्र, यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अथवा सरकारकडून कोणतीही मदत मिळालेली नाही. ते म्हणाले, ‘२८ राज्यात अपंगांचे संघ आहेत. रणजी, दुलिप ट्रॉफी अशा स्पर्धाही आम्ही घेतल्या आहेत. मिनी वर्ल्डकप घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. (प्रतिनिधी)
मालिका संपल्यावरच निवृत्ती योग्य
धोनीने आपल्या कसोटी कारकिर्दीतून निवृत्ती जाहीर केली. याबाबत वाडेकर म्हणाले, आॅस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील एक सामना शिल्लक असताना धोनीने कसोटीतून निवृत्ती जाहीर केली. त्याने मालिका संपल्यावरच निवृत्ती घेणे योग्य होते.