माळेशज घाटात कोसळली दरड
By Admin | Updated: June 23, 2015 11:52 IST2015-06-23T11:52:34+5:302015-06-23T11:52:41+5:30
मुसळधार पावसामुळे माळशेज घाटात मध्यरात्रीच्या सुमारास दरड कोसळल्याने अहमदनगर - कल्याण मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

माळेशज घाटात कोसळली दरड
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २३ - मुसळधार पावसामुळे माळशेज घाटात मध्यरात्रीच्या सुमारास दरड कोसळल्याने अहमदनगर - कल्याण मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. दरड कोसळल्यानंतर मोठमोठे दगड रस्त्यावर पडले असून रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूक कोंडीही झाली आहे. दरम्यान नगरहून येणारी वाहतूक आले फाटामार्गे तर मुरबाडहून नगरकडे जाणारी वाहतूक म्हासामार्गे वळवण्यात आली आहे.
प्रशासनाकडून दरड हटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून लवकरच वाहतूक पूर्ववत होईल असे समजते.