माळीण पुनर्वसन पुढील पावसाळ्यापूर्वी
By Admin | Updated: July 31, 2015 00:36 IST2015-07-31T00:36:10+5:302015-07-31T00:36:10+5:30
माळीण पुनर्वसनाची जागा निश्चित करण्यासाठी तसेच ते शासनाने करायचे की सोसायटीने याचा निर्णय न झाल्याने विलंब झाला. पुढच्या पावसाळ्यापूर्वी माळीण

माळीण पुनर्वसन पुढील पावसाळ्यापूर्वी
घोडेगाव : माळीण पुनर्वसनाची जागा निश्चित करण्यासाठी तसेच ते शासनाने करायचे की सोसायटीने याचा निर्णय न झाल्याने विलंब झाला. पुढच्या पावसाळ्यापूर्वी माळीण पुनर्वसनाचे काम पूर्ण करू, असा विश्वास विधानसभेचे माजी सभापती दिलीप वळसे-पाटील यांनी व्यक्त केला. वळसे-पाटील म्हणाले, की घरे ठेकेदारामार्फत बांधायची की ग्रामस्थांनी स्वत: बांधायची याबाबतचा निर्णय आपण सगळे मिळून बसून करूया़ नवीन सरकारने महसूल विभागातून हा निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.