शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
2
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
3
गिल 'गोल्डन डक' झाला अन् 'डगआउट'मध्ये बसलेल्या संजूसह पुन्हा चर्चेत आला 'वशीलेबाजी'चा मुद्दा
4
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
5
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
6
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
7
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
8
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
9
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
10
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
11
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
12
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
13
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
14
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
15
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
16
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
17
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
18
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
19
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
20
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
Daily Top 2Weekly Top 5

समर्थकाची बंडखोरी, अद्वय हिरेंचे आव्हान; दादाजी भुसेंची विजयाची वाट किती कठीण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 17:33 IST

Malegaon Outer Vidhan Sabha 2004: चार वेळा आमदार राहिलेले आणि दहा वर्षे मंत्रिपद सांभाळलेल्या दादा भुसे यांच्या मतदारसंघातील लढतीकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. या मतदारसंघात दादा भुसे यांच्याच समर्थकाने बंडखोरी केल्यानं निवडणूक आणखीनच रंगतदार झाली आहे. 

संजय पाठक, नाशिक Malegaon Outer Vidhan Sabha 2004 News: मालेगाव बाह्य मा कोणाशे जोर... असा अस्सल अहिराणी प्रश्न केला की मतदारांची कळी खुलते आणि मग गावातील पारावर बसलेले ज्येष्ठ, पानटपरी- चहाटपरीवर असलेले बोलू लागतात. प्रमुख उमेदवार त्यांची कामे किंवा नाराजी... कधी फिरकले नाही इथंपासून ते कोणी निवडून आले तरी काय फरक पडणार असा थेट प्रश्न करतात. पण एक मात्र जाणवतं की, मालेगाव बाह्यमधील जनता जागरूक आहे आणि ती निकाल योग्यच लावेल, इतकी पक्की राजकारणात मुरलेली!

पालकमंत्री दादा भुसे यांच्या पाचव्यांदा लढतीमुळे लक्षवेधी ठरलेल्या मालेगाव बाह्य मतदारसंघात खरे तर सुरुवातीपासूनच उद्धवसेनेच्या अद्वय हिरे यांच्यात सरळ लढत होणार असल्याची अटकळ होती. मात्र, दादा भुसेंचेच समर्थक असलेल्या बंडू काका बच्छाव यांनी निवडणूक रिंगणात उतरून सरळ लढत तिरंगी करून टाकली. 

मालेगाव बाह्य विधानसभा, तिरंगी लढतीत कोण-कोण?

वीस वर्षे आमदार असलेल्या दादा भुसे यांचे दहा वर्षे मंत्रिपद एका बाजूला तर शिवसेना दुभंगल्यानंतर दादा भुसे यांची भूमिका, त्यांचे पारंपरिक हिरे घराण्याचे प्रतिस्पर्धी, त्यातच त्यांच्याजवळील व्यक्तीने दिलेले आव्हान एका बाजूला अशा वातावरणात ही निवडणूक होत असल्याने तिरंगी लढतीत बाजी कोण मारणार असा प्रश्न आहे.

नाशिक जिल्ह्यातील पूर्वीचा दाभाडी मतदार संघ आता मालेगाव बाह्य म्हणून परिचय आहे. सुमारे १४० गावं असलेल्या या मतदारसंघात मालेगाव शहरालगतचा काही भाग आणि आणि माळमाथा परिसर देखील आहे. या मतदारसंघात गेल्या चार निवडणुकांमध्ये शिवसेनेचे वर्चस्व म्हणजेच भुसेंची दादागिरी दिसली आहे. 

हिरेंच्य अपेक्षा उंचावल्या

शिवसेना दुभंगल्यानंतर भुसे शिंदेसेनेत गेले तर अद्वय हिरे यांना पक्षात घेतल्यानंतर यांनी उद्धव सेनेने चांगले आव्हान निर्माण केले अशी चर्चा सुरू झाली. त्यातच मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील यशानंतर हिरे यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. दरम्यान, दोघांचा पेटलेला संघर्ष, फौजदारी कारवाया यानंतर दोघांमध्ये टस्सल लढत होणार असे दिसते. 

मात्र, याच दरम्यान, शिवसेनेकडे उमेदवारी मागण्यासाठी उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी गेलेल्या बंडूकाका बच्छाव यांनी उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी केल्याने दादा आणि हिरे या दोघांचीही तितकीच अडचण करून ठेवली आहे. अर्थात, असे असले तरी भुसे यांचे चार निवडणुकांमध्ये गावागावात असलेला संपर्क कमी नाही. त्यामुळे दादांना आव्हान देणे हे देखील सोपे नाही.

कारण राजकारण पालकमंत्री दादा भुसे यांच्या समवेत सतत राहणाऱ्या बंडूकाका बच्छाव यांनी बंडखोरी केली. त्यानंतर त्यांच्याबरोबर भाजपचे सुनील गायकवाड आणि अन्य काही पदाधिकारी फिरत असल्याचे सांगितले जाते. त्यावर आता सुनील गायकवाड यांच्यावर भाजपाने हकालपट्टीची कारवाई केली असली तरी दादा भुसे हे नाशिकचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे आगामी काळात नाशिकचे पालकमंत्रिपद कोणाकडे यावरूनही मतदारसंघा- बाहेरील नेतेही विरोधी उमेदवारांना पाठबळ देत असल्याच्या चर्चा ऐकायला मिळतात.

मतदार काय म्हणतात... 

निवडणूक खरे तर विकासाच्या मुद्द्यावर चर्चेत असते. त्यानुसार दादा भुसे यांनी प्रचारात छत्रपती शिवाजी महाराज शासकीय कृषी विज्ञान संकुल, अजंग-रावळगाव एमआयडीसी, नार पार गिरणा प्रकल्प, रस्ते, पीकविमा आणि लाडकी बहीण योजनेवर भर दिला आहे. 

संशयास्पद कामे, विशिष्ट लोक जवळ बाळगणे अशा प्रकारच्या विरोधकांच्या तक्रारी आहेत. अर्थात, या सर्व मुद्द्यांवर चर्चा होत असली तरी अन्य मुद्देही मांडले जात आहेत. नवीन चेहरा हवा हा मुद्दा हिरे आणि बंडूकाका यांचे समर्थक गावकरी मांडतात. तर दुसरीकडे आता सुरू असलेल्या कामे पूर्ण करण्यासाठी दादा भुसेंची गरज लागेल असाही एक मुद्दा आहे. 

संवदगाव, सायने, चंदनपुरी, चिखल ओहोळ या गावांत कानोसा घेतल्यानंतर ही मते ऐकू येतात अर्थात सवंद गावात तर मात्र बस शेड नाही, व्यायामशाळा अर्धवट बांधून पडून आहे, कोणीही निवडून आले तरी कामे करणार आहेत, का असा प्रश्न ग्रामस्थ करतात.

हे आहेत कळीचे मुद्दे 

मालेगाव जिल्हा निर्मितीचे केवळ आश्वासनच होते आणि ते कागदावरच राहिले. एमआयडीसी वाढल्या, अजंग वडेल येथेही वसाहत झाली, मात्र अपेक्षित मोठा उद्योग आला नाही. नार पार योजना मंजूर झाली, परंतु ती • प्रत्यक्षात कधी येणार तसेच यासंदर्भात श्रेयवादाचा मुद्दा देखील प्रचारात आहे. 

मालेगाव शहरातील या मतदार संघात स्थलांतरितांचा त्रास आणि वाढती गुन्हेगारी. मालेगाव बाह्य मतदारसंघात असलेला परंतु मनपाशी संबंधित उड्डाणपूल रखडलेला आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४north maharashtra regionउत्तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूकmalegaon-outer-acमालेगाव बाह्यMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी