सहसंचालकांकडून ‘माळेगाव’ची चौकशी

By Admin | Updated: September 5, 2016 01:38 IST2016-09-05T01:38:35+5:302016-09-05T01:38:35+5:30

प्रादेशिक सहसंचालकांकडून माळेगाव कारखान्याच्या चौकशी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

'Malegaon inquiry' by Joint Director | सहसंचालकांकडून ‘माळेगाव’ची चौकशी

सहसंचालकांकडून ‘माळेगाव’ची चौकशी


बारामती : प्रादेशिक सहसंचालकांकडून माळेगाव कारखान्याच्या चौकशी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. साखर आयुक्त कार्यालयात थकबाकी प्रकरणावरून शासनस्तरावरून तक्रारींची शहानिशा करण्यात येत आहे. त्यानुसार प्रादेशिक सहसंचालकांनी माळेगाव कारखान्याच्या प्रशासनाची चौकशी केली.
प्रादेशिक सहसंचालक शशिकांत घोरपडे, विशेष लेखा परीक्षक अनिल सोनवणे यांनी तक्रार प्रकरणातील कागदपत्रे कार्यकारी संचालक विजय वाबळे यांच्यामार्फत तपासली. माळेगाव कारखान्याच्या काही संचालकांनी बिनव्याजी अनामत रकमा वापरणे, उधारीवर घेतलेली खते व दिवाळी अ‍ॅडव्हान्स मुदतीत परत न करणे, गणपूर्ती नसतानाही साखर विक्री करणे, गॅस एजन्सीद्वारे झालेला कारखान्याशी व्यवहार आदी विषयांचा तक्रारींमध्ये समावेश होता. याशिवाय विठ्ठल देवकाते यांच्यासह तक्रारकर्त्यांचीही भूमिका या वेळी घोरपडे यांनी ऐकली. या चौकशीच्या पार्श्वभूमीवर माळेगाव कारखान्यावर सत्ताधारी व विरोधक बसून होते. यामध्ये कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे, ज्येष्ठ संचालक चंद्रराव तावरे, शशिकांत कोकरे, सुरेश खलाटे,जवाहर इंगुले, अ‍ॅड. तानाजी पोंदकुले, सुनील सातव, जनार्धन झांबरे, लक्ष्मण जगताप, कामगार संचालक संदेश गावडे, विरोधी गटाचे उपाध्यक्ष रामदास आटोळे, बाळासाहेब गवारे, रामभाऊ देवकाते, राजेंद्र बुरूंगले आदी उपस्थित होते.
(प्रतिनिधी)

Web Title: 'Malegaon inquiry' by Joint Director