माळशेज घाटात पुन्हा दरड कोसळली

By Admin | Updated: August 3, 2016 00:46 IST2016-08-03T00:46:03+5:302016-08-03T00:46:03+5:30

मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे रात्री १० वाजता नगर-कल्याण महामार्गावरील माळशेज घाटात पुन्हा दरड कोसळली.

Malashej valley again collapsed | माळशेज घाटात पुन्हा दरड कोसळली

माळशेज घाटात पुन्हा दरड कोसळली

ऑनलाइन लोकमत
खोडद, दि. 3 - मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे रात्री १० वाजता नगर-कल्याण महामार्गावरील माळशेज घाटात पुन्हा दरड कोसळली. त्यामुळे घाटातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. गेल्या महिन्याभरात या घाटात आतापर्यंत दरड कोसळण्याची ही तिसरी घटना आहे. घाटातील छत्री पॉर्इंट पासून पुढील वळणावर ही दरड कोसळली आहे. पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत. रात्र असल्याने दुरूस्तीच्या कामात अडथळे येण्याची शक्यता असून उद्यापासून वाहतूक पूर्ववत करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न राहिल.दोन दिवसांपूर्वी ठाण्याच्या जिल्ह्याधिका-यांनी घाटाची पाहणी करून अनके ठिकाणी दरडी कोसळण्याची शक्यता वर्तवली होती.

Web Title: Malashej valley again collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.