ओलाचिंब माळशेज घाट वाटतो रोज नवा नवा!

By Admin | Updated: July 29, 2014 23:03 IST2014-07-29T23:03:24+5:302014-07-29T23:03:24+5:30

या ओळींप्रमाणो माळशेज घाट आपण रोज जरी सफर केला, तरी येथे रोज नवीन असल्यासारखे वाटते.

Malachi Malshege Ghat daily new new! | ओलाचिंब माळशेज घाट वाटतो रोज नवा नवा!

ओलाचिंब माळशेज घाट वाटतो रोज नवा नवा!

अशोक खरात - खोडद
धुंद हवा, त्याच्या जोडीला पाऊस अन् गारवा..! 
यामुळे ओलाचिंब माळशेज घाट वाटतो रोज नवा नवा..!
या ओळींप्रमाणो माळशेज घाट आपण रोज जरी सफर केला, तरी येथे रोज नवीन असल्यासारखे वाटते. दर वर्षी पावसाळा सुरू झाला, की सर्वाना माळशेज घाटात फिरायला येण्याचे वेध लागतात. नैसर्गिक सौंदयाचे अप्रतिम रूप म्हणजे माळशेज घाट. येथे येणा:या पर्यटकांची व निसर्गप्रेमींची  गर्दी दर वर्षी वाढतच आहे. 
माळशेज घाट म्हणजे केवळ उंचावरून फेसाळत कोसळणारे धबधबे आणि त्या धबधब्यांखाली बेधुंद होऊन नाचणो एवढेच वैशिष्टय़ नसून ऐतिहासिक, भौगोलिक, नैसर्गिक आणि हवामानदृष्टय़ा घाटाला एक अद्भुत देणगी लाभली आहे.
पुण्यापासून सुमारे 125 कि.मी., कल्याणहून 9क् कि.मी. आणि अहमदनगरहून 1क्6 कि.मी.अंतरावर सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये माळशेजघाट विस्तारलेला आहे. समुद्रसपाटीपासून उंची 6क्क् ते 19क्क् मीटर्पयत आहे. दुतर्फा काळे भिन्न कडे इतके उंच आहेत, की त्या शिखरांवर आपली दृष्टी स्थिरावत नाही. हे कडे पावसाळ्यात न्हाऊन निघाल्यामुळे हिरवेगार दिसतात.
 
4समुद्रसपाटीपासूनची उंची, पश्चिमेकडून वाहणारे वारे, भरपूर पाऊस व घनदाट जंगलांमुळे येथील हवामान एकंदरीत थंड व कोरडे असते. माळशेजचा काही परिसर कळसूबाई व हरिश्चंद्र अभयारण्यात पण येतो. घाटात प्रचंड मोठय़ा देवराया असून, महादेव कोळी, कातकरी, धनगर या समाजाचे लोक माळशेजघाट परिसरात राहतात. शेती पिकवणारी धरती, पाणी देणारा वरुण आणि गाई ही त्यांची प्रमुख दैवते आहेत. भात, नागली (चाचणी) आणि वरई ही त्यांच्या शेतातील प्रमुख पिके आहेत. इतर पारंपरिक धान्यांमध्ये सावा आणि कारळाणा (काळे तीळ ) यांचा समावेश आहे.
 
4येथे निसर्गाचे विशेष रूप पाहावयास मिळते ते म्हणजे ‘डाईक’.  संशोधकांच्या मते डेक्कन ट्रॅप पूर्व काळात पृथ्वीवरील एखाद्या भेगेमध्ये अथवा तडय़ात वाहणा:या मॅग्माने प्रवेश केला असावा. कालांतराने आजूबाजूचा खडक ङिाज व धूप या कारणांनी नाहीसा होत गेला. 
4आतिल मॅग्मा मात्र कातळाच्या वेडय़ावाकडय़ा रूपाने आजही आपल्याला पाहावयास मिळतो. सह्याद्रीमधील ही अश्मरचना 2क्-3क् सेंमीपासून 3क्-4क् मीटर रुंदीच्या मोठय़ा भिंती किंवा लांबचलांब कडे यांच्या रूपाने माळशेजमध्ये दिसतात. 
 
जंगल परिसरातून शिकेकाई, शेवाळ, मध, हिरण, औषधी वनस्पती आणि कारवी गोळा केली जाते. महादेव कोळी पशुपालनाबरोबरच अधूनमधून जंगलाची कामेही करतात. ते जंगलातून फळे आणि कंदमुळे गोळा करणो याबरोबरच शिकारही करतात. या लोकांचा बराचसा आहार एकसुरी असला, तरी पावसाळ्यात देठ, कुरडू, बरकी, रानआळू, कांजी माठवेल, करडुकी, बारभोकर, मोहटय़ा आणि चाघोटी अशा रानभाज्या व खेकडे व मासेदेखील खातात. 
- राजकुमार डोंगरे, वनस्पती अभ्यासक
 
दर वर्षी सुमारे 3 हजार मिलिमीटर एवढा पाऊस
4तीव्र उतारावर विरळ झाडीच्या प्रदेशात मुरमाड, रेताड, तांबडी माती, तर कमी उताराच्या क्षेत्रत पठारी भागात व द:याखो:यांमध्ये ब:यापैकी काळपट-तांबडी चिकण माती आढळते. माळशेज घाटात दर वर्षी सुमारे 3 हजार मिलिमीटर एवढा पाऊस पडतो. हा पाऊस सुमारे 55 ते 6क् दिवसांत पडतो. उंच शिखर पठारांवर सुमारे 5 हजार मिलिमीटर एवढा पाऊस पडतो. 
4माळशेज घाटात सदाहरित, निमसदाहरित व आद्र्र पानझडी असे तीनही प्रकारचे जंगल आढळते. सदाहरित जंगलांमध्ये प्रामुख्याने पिसा, जांभूळ, हिरडा, पिसी, आंबा, काटे कुंबळ, शेंदरी, पारजांभूळ व अंजनी हे वृक्ष आढळतात; तर वड, पिंपळ, उंबर, लोन, तमालपत्र, फणस, कुकर, विखार, एरंडी, हसोळी, अंबेरी, भेडस, गेला, आळू, राईकुडा हे वृक्षही आढळतात. 

 

Web Title: Malachi Malshege Ghat daily new new!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.