शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

Video: 'चांद्रयान-२'च्या रॉकेटला महाराष्ट्राची 'पॉवर'; 'वालचंदनगर'मध्ये बनले इंधन साठवणारे 'बूस्टर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2019 12:15 IST

चंद्रावर जीवसृष्टी तसेच पाण्याचे अस्तित्व आहे की नाही, याचा शोध घेण्यासाठी १५ जुलै रोजी भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) चांद्रयान २ मोहिमेद्वारे यान पाठविणार आहे.

ठळक मुद्देअंतराळ संशोधन मोहिमेत कंपनीचा मोलाचा वाटा इस्रोच्या शास्त्रज्ञांबरोबर केले विकसित या प्रकारची क्षमता असणारा भारत जगातील पाचवा देश

- निनाद देशमुख

पुणे : चंद्रावर जीवसृष्टी तसेच पाण्याचे अस्तित्व आहे की नाही, याचा शोध घेण्यासाठी  १५ जुलै रोजी भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) चांद्रयान २ मोहिमेद्वारे चंद्रावर यान पाठविणार आहे. या मोहिमेसाठी ‘जीएसएलव्ही मार्क ३’ या प्रक्षेपास्त्राचा वापर करण्यात येणार असून त्याला अवकाशात झेपावण्यासाठी लागणारे बूस्टरचे केसिंग इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर इंडस्ट्रीमध्ये बनविण्यात आले आहे. या प्रकारची क्षमता असणारा भारत जगातील पाचवा देश ठरला आहे.

अवकाश मोहिमांत विविध विक्रम प्रस्थापित करून इस्रोने देशाचे नाव मोजक्या देशांच्या यादीत नेले आहे. गेल्या दशकात अनेक अंतराळ मोहिमा आखत देशाचा लौकिक वाढविला आहे. या मोहिमांसाठी लागणारी महत्त्वाची प्रणाली बनविण्याची जबाबदारी  इस्रोेच्या शास्त्रज्ञांनी वालचंदनगर इंडस्ट्रीला दिली आहे. ही जबाबदारी या कंपनीच्या अभियंत्यांनी लीलयापार पाडली आहे. चांद्रयान १ मोहिमेबरोबरच मंगळ यान मोहिम तसेच एकाच वेळी १०० पेक्षा अधिक उपग्रह सोडण्यासाठी पहिल्या स्टेजमधील महत्त्वाची बूस्टर केसिंग वालचंदनगर कंपनीच्या अभियंत्यांनी बनविली आहे.

कंपनीने यासाठी खास व्यवस्था केली आहे. यासाठी लागणारे पोलाद इस्रोने उपलब्ध करून दिले आहे. त्यावर प्रक्रिया करण्याचे अत्यंत अवघड काम वालचंदनगर इंडस्ट्रीमध्ये करण्यात आले. अंतराळात उपग्रह सोडण्यासाठी भारताकडे पीएसएव्ही आणि जीएसएलव्ही मार्क ३ ही प्रक्षेपास्त्र आहेत. ते अवकाशात पाठविण्यासाठी बूस्टर गरजेचे असते. 

काय आहे बूस्टर प्रणालीकुठल्याही प्रक्षेपास्त्राला अंतराळात झेपावण्यासाठी पहिल्या स्टेजमध्ये बूस्टर प्रणाली महत्वाची असते. या बुस्टरमध्ये घनरूपातील इंधन असते. या इंधनाच्या जोरावर प्रक्षेपास्त्र अवकाशात पाठविले जाते. प्रक्षेपास्त्राला हवेत दिशा देण्यासाठी लागणारी ‘एस २०० फ्लेक्स नॉझल कंट्रोल टँकेज’ यंत्रणाही वालचंदनगर इंडस्ट्रीतील अभियंत्यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या मदतीने विकसित केली आहे. संरक्षण सिद्धतेत देशाला स्वयंपूर्ण बनविण्यासाठी मोलाचे योगदान भारताच्या सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणात परदेशातून शस्त्रास्त्र आयात केली जातात. मात्र, संरक्षण सिद्धतेत देश स्वयंपूर्ण व्हावा, या हेतून अनेक स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करण्यात आले असून वालचंदनगर इंडस्ट्रीद्वारे ती विकसित करण्यात येत आहे. देश स्वयंपूर्ण व्हावा या एकमेव उद्देशाने वालचंद हिराचंद यांनी विमान, जहाजे व मोटारी या क्षेत्रात पाय रोवले. आज अवकाश तंत्रज्ञानाबरोबर अणुतंत्रज्ञानातही वालचंद इंडस्ट्रीने महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.

अंतराळ क्षेत्रात देशाला स्वयंपूर्ण बनविण्यासाठी इस्रोचे शास्त्रज्ञ मोलाची कामगिरी करत आहेत. अंतराळ मोहिमेसाठी लागणाऱ्या अनेक महत्त्वाच्या प्रणाली वालचंदनगर इंडस्ट्रीमध्ये बनविल्या जात आहेत, याचा आम्हाला अभिमान वाटतो. - जी. के. पिल्लई व्यवस्थापकीय संचालक, वालचंदनगर इंडस्ट्रीज. 

टॅग्स :IndapurइंदापूरPuneपुणेChandrayaan 2चांद्रयान-2isroइस्रो