शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
2
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
6
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
7
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
8
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
9
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
10
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
11
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
12
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
13
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
14
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
15
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
16
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
17
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
18
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
19
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
20
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'

मुद्रांक शुल्क एक टक्का करा, ग्राहकांना लाभ मिळेल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2021 5:33 AM

Real Estate : बांधकाम व्यावसायिकांची मागणी; तर गृहविक्रीही वाढेल

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्य शासनाला जर कोरोनामुळे बिघडलेली आर्थिक गणिते दुरुस्त करावयाची असतील, बांधकाम व्यवसायाला चालना देण्याची आणि सामान्यांना परवडणारी घरे देण्याची खरेच इच्छा आहे तर बांधकाम व्यावसायिकांना अधिमूल्यावर (प्रीमियम) मध्ये सवलत देऊन त्यांना मुद्रांक शुल्क भरायला लावण्याऐवजी सरळ मुद्रांक शुल्क या कालावधीसाठी केवळ एक टक्का करावे. म्हणजे थेट ग्राहकाला लाभ मिळेल, अशी मागणी बांधकाम व्यावसायिकांनी केली आहे.

राज्य सरकारने गृहप्रकल्पावरील प्रीमियमवर ५० टक्के सूट देताना ग्राहकांचे मुद्रांक शुल्क विकासकांनी भरावे, अशी अट घातली आहे. यावर बांधकाम व्यावसायिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. या संदर्भात ‘लोकमत’शी बोलताना ते म्हणाले, एका हाताने सवलत देत दुसऱ्या हाताने बांधकाम व्यावसायिकांना त्याहून अधिक रक्कम भरायला लावणारा, आवळा देऊन कोहळा काढणारा हा निर्णय आहे. प्रत्यक्ष विचार करता, सर्व अधिमूल्यावर (प्रीमियम) मिळणारी ५० टक्के सवलत ही ४ टक्के मुद्रांक शुल्क असताना त्याच्या अर्धी, तर ६ टक्के मुद्रांक शुल्क असताना त्याच्या केवळ एक तृतीयांश भरते. आता प्रत्येक वेळी प्रत्येक गृहविक्री व्यवहारात इतका तोटा सहन केला तर बांधकाम क्षेत्राला चालना मिळेल की त्याच्या चालत्या गाड्याला खीळ बसेल, असा सवाल त्यांनी केला आहे.

जे सवलत घेणार नाहीत त्यांचे काय?ज्यांनी प्रीमियम सवलत घेतली त्यांनाच ग्राहकांचे मुद्रांक शुल्क भरावे लागेल. म्हणजे अशा प्रकल्पांतच ग्राहकांना हा लाभ मिळेल. जर नुकसान होते आहे असे पाहून बांधकाम व्यावसायिकांनी ही सवलत घेतली नाही, तर ग्राहकांना लाभ मिळणार नाही.  जर घर घेणे स्वस्त आणि परवडणारे करावयाचे आहे तर शासनाने घर खरेदी व्यवहारातील मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क एक टक्का करावे आणि उद्देश सफल करावा.

या बाबींचा विचार कोण करणार?n एकात्मिक विकास नियंत्रण नियमावलीनुसार ज्यांनी ३१ डिसेंबर २०२० पूर्वी चलान भरले आहे, त्यांच्याबाबत काय प्रक्रिया असेल हे अजून स्पष्ट नाही.n प्रीमियम कमी केल्यावर जर कोणी हस्तांतरणीय विकास हक्क (टीडीआर) विकत घेणार नसेल तर सरकारला मालमत्ता संपादनापोटी मोठी नुकसानभरपाई द्यावी लागेल. अन्यथा मालमत्ताधारक आपली मालमत्ता विकासकामांसाठी कदापि देणार नाहीत.

टॅग्स :Real Estateबांधकाम उद्योग