पैसे द्या, रस्ता वापरा
By Admin | Updated: November 19, 2014 05:08 IST2014-11-19T05:08:02+5:302014-11-19T05:08:02+5:30
मुंब्रा-कौसा परिसरात सुमारे दीड कोटी रु पये खर्च करून पालिकेने सार्वजनिक रस्ता बांधला आहे. मात्र या रस्त्यावरून जाण्यासाठी पैसे आकारले जात आहेत

पैसे द्या, रस्ता वापरा
ठाणे : मुंब्रा-कौसा परिसरात सुमारे दीड कोटी रु पये खर्च करून पालिकेने सार्वजनिक रस्ता बांधला आहे. मात्र या रस्त्यावरून जाण्यासाठी पैसे आकारले जात आहेत. पैसे दिल्याशिवाय प्रवेश मिळत नसल्याच्या तक्रारी या परिसरातील नागरिकांनी पालिकेकडे केल्या आहेत. यासंदर्भात येथील रहिवाशांनी मंगळवारी पालिका आयुक्त असीम गुप्ता यांची भेट घेऊन त्यांना एक निवेदन दिले आहे.
या रस्त्याच्या सुरुवातीलाच अनधिकृत लोखंडी गेट बांधण्यात आले आहे. या गेटमधून गाडीला प्रवेश दिला जात नसल्याने मंगळवारी रहिवाशांनी पालिका आयुक्तांची भेट घेतली. याविरोधात बेमुदत उपोषण करण्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे. कौसा परिसरामध्ये ‘एकॉर्ड कॉम्प्लेक्स’ आहे. या कॉम्प्लेक्समध्ये २१ इमारती आहेत. या प्रत्येक इमारतीला कम्पाउंड आहे. स्वतंत्र गेटदेखील आहे. याच परिसरात मदरसा आणि एक मशीद असून मदरशामध्ये ५ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात तर मशिदीमध्ये मोठ्या संख्येने मुस्लीम बांधव येतात.
गेल्या वर्षी दीड कोटी रुपये खर्च करून पालिकेने हा रस्ता तयार केला. आधी तिथे गेट बांधण्यात आले. तसेच एक अनधिकृत कार्यालय बांधले. तिथे पार्किंगसाठी पैसे आकारले जातात, अशा तक्रारी आहेत. (प्रतिनिधी)