सोशल मीडियावरून करा पैसे ट्रान्सफर
By Admin | Updated: February 10, 2015 03:07 IST2015-02-10T03:07:24+5:302015-02-10T03:07:24+5:30
तुम्ही जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असाल आणि मित्राला-नातेवाइकाला तातडीने पैसे हवे असतील याकरिता आता फक्त तुम्ही आणि ती व्यक्ती फेसबुक

सोशल मीडियावरून करा पैसे ट्रान्सफर
मनोज गडनीस, मुंबई
तुम्ही जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असाल आणि मित्राला-नातेवाइकाला तातडीने पैसे हवे असतील याकरिता आता फक्त तुम्ही आणि ती व्यक्ती फेसबुक किंवा टिष्ट्वटरसारख्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर असणे गरजेचे आहे. यापैकी कोणत्याही सोशल मीडियावर असाल तर एका मिनिटात तुम्हाला मनी ट्रान्सफर करणे शक्य होणार आहे.
यामुळे, इंटरनेट बँकिंगचे अप्रूप कमी होणार असून, तिथे जाऊन लॉग-इन करणे, बेनिफिशरी म्हणून त्या व्यक्तीला अॅड करणे हा द्राविडी प्राणायमही टळणार आहे. सध्या आॅनलाइन पैसे ट्रान्स्फर करण्यासाठी प्रथम संबंधित व्यक्तीच्या बँक खात्याची आपल्या खात्यात नोंद करावी लागते. त्यानंतर आरटीजीएस (रियल टाइम ग्रॉस सेटलमेंट) किंवा एनईएफटी (नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्स्फर) या दोन माध्यमांद्वारे पैसे हस्तांतरित करता येतात. पण या दोन्ही प्रक्रियेद्वारे होणाऱ्या व्यवहाराद्वारे लागणारा कालावधी किमान एक तास ते कमाल तीन तास इतका आहे. पण स्मार्टफोनद्वारे सोशल मीडिया आणि मोबाइल बँकिंगचा वाढता प्रसार लक्षात घेता नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन या संस्थेने ‘इमिजीएट पेमेंट सर्व्हिस’ (आयएमपीएस) हे तंत्रज्ञान विकसित केले असून, याद्वारे हे मनी ट्रान्स्फर शक्य झाले आहे.
देशातील काही प्रमुख खासगी बँकांनी या तंत्रज्ञानाचा अवलंब केला असून, याकरिता वेगळी वेबसाईट तयार केली आहे. इथे एकदा नोंदणी केली की, यानंतर जेव्हा पैसे ट्रान्स्फर करायचे असतील त्या वेळी फक्त तुम्हाला संंबंधित व्यक्तीच्या फेसबुक किंवा टिष्ट्वटरच्या वॉलवर जाऊन त्याचे नाव सिलेक्ट करावे लागेल. हा व्यवहार अधिक सुरक्षित करण्याच्या दृष्टीने प्रत्येक व्यवहारावेळी तुम्हाला एसएमएसद्वारे ‘ओटीपी’ अर्थात ‘वन टाइम पासवर्ड’ मिळेल. तो व्यवहाराच्या शेवटच्या टप्प्यात टाकला की तो व्यवहार पूर्ण होईल. या ‘ओटीपी’ची मर्यादा एक तास इतकीच असेल. सध्या या तंत्राद्वारे दिवसाकाठी अडीच हजार रुपये किंवा महिन्याकाठी २५ हजार रुपयांपर्यंत पैसे हस्तांतरित करण्याची मुभा देण्यात आली आह