‘भारताला हिंदू राष्ट्र करा’
By Admin | Updated: December 26, 2014 02:11 IST2014-12-26T02:11:14+5:302014-12-26T02:11:14+5:30
देशात सरकार चालवायचे असेल, तर भारताला संविधानिक रुपाने हिंदू राष्ट्र बनवावे लागेल़,

‘भारताला हिंदू राष्ट्र करा’
वर्धा : देशात सरकार चालवायचे असेल, तर भारताला संविधानिक रुपाने हिंदू राष्ट्र बनवावे लागेल़, असा इशारा देत अप्रत्यक्षपणे विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी गुरुवारी मोदी सरकारच्या अडचणी वाढविल्या. तसेच त्यांनी पुन्हा धर्मांतर बंदीचा सूर आवळला.
वर्धेत आयोजित विश्व हिंदू परिषदेच्या वतीने आयोजित अधिवेशनात ते बोलत होते़ तोगडिया म्हणाले, भारतात हिंदूंचे बहुमत पुढील एक हजार वर्षांपर्यंत कायम ठेवण्यासाठी हिंदुंची संख्या ८२ टक्क्यांहून ४२ टक्क्यांवर आणायची नाही, तर १०० टक्के करायची आहे. यासाठी भारताला संविधानिक हिंदू राष्ट्र बनवावे लागेल. देशात शासन चालवायचे असेल तर हे करावे लागेल, असा इशाराच त्यांनी दिला.
यापुढे देशात एकाही हिंदूचे धर्मांतर होऊ देणार नाही. सर्वच राजकीय पक्षांना ही बाब पटणारी आहे, असा सूर ऐकायला मिळाला. तेव्हा केंद्र शासनाला वेळ वाया न दवडता धर्मांतर बंदीचा कायदा अस्तित्वात आणावा लागेल, अशा शब्दात डॉ. तोगडिया यांनी विहिंपचा भविष्यातील अॅक्शन प्लानच जाहीर केला. (प्रतिनिधी)