राज्यातही परिवर्तन घडवा - फडणवीस

By Admin | Updated: October 10, 2014 05:23 IST2014-10-10T05:23:45+5:302014-10-10T05:23:45+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारचा पराभव करा आणि भाजपाला संधी देत परिवर्तन घडवा

Make changes in state - Fadnavis | राज्यातही परिवर्तन घडवा - फडणवीस

राज्यातही परिवर्तन घडवा - फडणवीस

चाळीसगाव /भडगाव (जि.जळगाव) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारचा पराभव करा आणि भाजपाला संधी देत परिवर्तन घडवा. लोकसभा निवडणुकीनंतर आपल्याला चांगले परिणाम पाहायला मिळाले आहे म्हणून त्या दिशेने आताही पावले उचलावी, असे आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी चाळीसगाव व भडगाव येथे केले.
भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते म्हणाले की, महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असल्याची जाहिरात काँग्रेस करीत आहे. प्रत्यक्षात मात्र हा क्रमांक पुढून की मागून आहे, हे त्यांनी सांगावे. राज्यात आतापर्यंत ६० हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या याला जबाबदार कोण? २०१२ पर्यंत भारनियमन मुक्तीची घोषणा करुनही त्यातून राज्य मुक्त होऊ शकले नाही, याचे उत्तर आघाडी सरकारने द्यावे, असे फडणवीस म्हणाले़ (वार्ताहर)

Web Title: Make changes in state - Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.