शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

भात नुकसान भरपाई निकषात बदल करा, नीतेश राणे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2017 21:43 IST

अवकाळी पावसाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात शेतींचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळावी. तसेच नुकसान भरपाईसाठी असलेल्या शासनाच्या जाचक अटीत बदल करावा, यासह अन्य मागण्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदार नितेश राणे यांनी मुंबई येथील वर्षा या त्यांच्या निवासस्थानी सोमवारी भेट घेतली.

 कणकवली - अवकाळी पावसाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात शेतींचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळावी. तसेच नुकसान भरपाईसाठी असलेल्या शासनाच्या जाचक अटीत बदल करावा, यासह अन्य मागण्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदार नितेश राणे यांनी मुंबई येथील वर्षा या त्यांच्या निवासस्थानी सोमवारी भेट घेतली. तसेच त्याना मागण्यांचे निवेदन दिले.सिंधुदुर्ग जिल्ह्यात सप्टेंबर महिन्याच्या अखेर पासून दररोज पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे भात शेतीचे फार मोठे नुकसान झाले आहे. दरवर्षी भात शेतीचे नुकसान होते. मात्र, शासनाच्या नुकसान भरपाईच्या अटी व निकषामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पासून वंचित रहावे लागते. त्यामुळे सिंधुदुर्गात मुख्य पिक असलेल्या भातशेती खालील क्षेत्रामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात घट होत आहे.यावर्षी 63000 हेक्टर क्षेत्र भातशेतीखाली येणे अपेक्षित असताना फक्त 53,320 हेक्टर क्षेत्रामध्ये भातशेतीची लागवड करण्यात आली. म्हणजे सुमारे 10000 हेक्टर भातशेतीचे क्षेत्र कमी झाले आहे. असेच यापुढेही चालु राहिल्यास शेतकरी भविष्यात भाताचे पिक घेणे बंद करतील की काय?असा प्रश्न निर्माण होण्यासारखी स्थिति निर्माण झाली आहे.केंद्र शासनाच्या शेतीला द्यायच्या नुकसान भरपाईबाबतच्या निकषानुसार एकाच दिवशी 65 मिमी पाऊस पडल्याची नोंद ज्या गावामध्ये होते त्याठिकाणी 16000 रूपये नुकसान भरपाई देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. परन्तु सध्या कोकणात पडणारा पाऊस हा एकाच दिवशी 65 मिमी न पड़ता दरदिवशी 25 ते 30 मिमी पड़त आहे. त्यामुळे शासनाच्या निकषाप्रमाणे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळू शकत नाही.त्यामुळे नुकसान भरपाई मिळण्यासाठी एका दिवसात 65 मिमी पाऊसा ऐवजी सलग तिन दिवस पडणाऱ्या पावसाची नोंद 65 मिमी पेक्षा अधिक असेल तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल,असा सुधारित निर्णय व्हावा. अशी मागणी आमदार नीतेश राणे यांनी यावेळी केली.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNitesh Raneनीतेश राणे