शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

कामबंद आंदोलनातही मोठ्या शस्त्रक्रिया सुरू; निवासी डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर किंचित परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2024 10:02 IST

शिक्षण विभागाचे लेखी आश्वासन, सुरक्षा आढाव्याच्या अधिष्ठात्यांना सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्यातील निवासी डॉक्टरांच्या कामबंद आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी रुग्णसेवेवर किंचित परिणाम झाला. आंदोलन काळातही महापालिका आणि शासकीय   रुग्णालयांत दिवसभरात २७३ छोट्या आणि काही मोठ्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. संपातही अध्यापकांच्या मदतीने नियमित कामे सुरू असून, बाह्य रुग्ण विभागातील रुग्णांनाही दुपारपर्यंत तपासण्यात आले. अत्यावश्यक सेवा सुरू असल्याने रुग्णसेवेवर कोणताही गंभीर परिणाम झालेला नाही.  या काळात शवविच्छेदन करून अहवालही वेळेवर देण्यात आले, असे सूत्रांनी सांगितले.

निवासी डॉक्टरांच्या काम बंद आंदोलनामुळे रुग्णसेवा काही प्रमाणात विस्कळीत झाली आहे. मात्र, रुग्णालयाच्या अध्यापकांनी उशिरापर्यंत बाह्य रुग्ण विभागात बसून शिकाऊ डॉक्टर आणि परिचारिकांच्या मदतीने सर्व रुग्णांना उपचार दिले गेले. त्याचप्रमाणे तातडीने उपचाराची गरज असलेल्या रुग्णांना दाखल करून घेण्यात आले. निवासी डॉक्टरांचे कामबंद आंदोलन सुरू असल्याने बुधवारी रुग्णालयांच्या बाह्य रुग्ण विभागांत नेहमीपेक्षा कमी रुग्ण आले होते.  त्याशिवाय नियोजित शस्त्रक्रिया करण्यासाठी येणारे अनेक रुग्ण आंदोलनामुळे दाखल झाले नाहीत, असे सांगण्यात आले. गुरुवारीही हे आंदोलन सुरू राहणार आहे.

 

  • शिक्षण विभागाचे लेखी आश्वासन- जुन्या वसतिगृहांची डागडुजी, नवी वसतिगृहांची उभारणी, तसेच वसतिगृहांना संरक्षक भिंती, निवासी डॉक्टरांचे विद्यावेतन वेळेत देणे या मागण्यांची पूर्तता करण्याकरता वैद्यकीय शिक्षण विभागाने चार अधिष्ठात्यांची समिती नेमली आहे. समितीने सर्व गोष्टींचा अभ्यास करून दोन महिन्यांत विभागाला अहवाल सादर करणे गरजेचे आहे. 
  • सुरक्षा आढाव्याच्या अधिष्ठात्यांना सूचना 

वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकर यांनी बुधवारी विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रमुखांची बैठक घेतली. प्रत्येक अधिष्ठात्याने आपल्या रुग्णालयातील सुरक्षिततेचा आढावा घेण्याचे आदेश त्यांनी दिले. तसेच त्यासाठी स्वतंत्र समिती नेमावी अशी सूचनाही दिली. रुग्णालय परिसरात कोणत्या ठिकाणी पथदिवे आणि सीसीटीव्हीची गरज आहे, त्याचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या, असे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :doctorडॉक्टरStrikeसंपHealthआरोग्य