शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
4
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
5
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
6
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
7
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
8
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
9
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
10
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
11
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
12
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
13
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
14
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
15
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
16
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
17
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
18
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
19
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
20
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला

वाझेप्रकरणानंतर पोलीस दलात मोठे फेरबदल; परमबीर सिंग यांना हटविले, नगराळे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 2:47 AM

महासंचालक पदावरून मुंबई पोलीस आयुक्तपदी निवड होण्याची ही पहिलीच घटना आहे. नगराळेंकडे डीजीपीचा तात्पुरता पदभार असला तरी यूपीएससी निवड समितीच्या शिक्कामोर्तबानंतर त्यांच्याकडे पद राहणार होते. 

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ सापडलेली स्फाेटकांनी भरलेली कार तसेच मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या कथित सहभागाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पोलीस दलात बुधवारी मोठे फेरबदल केले. परमबीर सिंग (Parambir Singh) यांची मुंबई पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी करत होमगार्डचे महासंचालक म्हणून बदली केली. तर राज्याचे प्रभारी पोलीस महासंचालक हेमंत नगराळे (Hemant Nagrale) यांची मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवारी सायंकाळी त्यांनी पदाची सूत्रे स्वीकारली. (   Major reshuffle in police force after Vaze case; Nagarale is new police commissioner of Mumbai)

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक रजनीश सेठ यांच्याकडे पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. राज्यातील सर्वात ज्येष्ठ आयपीएस संजय पांडे यांची होमगार्डमधून राज्य सुरक्षा महामंडळाच्या महासंचालकपदी बदली करण्यात आली. गृहमंत्री अनिल  देशमुख यांनी ट्विटरवरून या नव्या बदलांची माहिती दिली. स्फोटक कारप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने वाझे यांना अटक केल्यापासून एनआयएकडून परमबीर सिंग यांची चौकशी केली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळेच राज्य सरकारने त्यांना आयुक्त पदावरून बाजूला करण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा गृह विभागात आहे. पोलीस दलाच्या इतिहासात पहिल्यांदाच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जबाबदारीमध्ये अनपेक्षितपणे इतक्या मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्यात आले.

सचिन वाझे प्रकरणात आयुक्तपदावरून गच्छंती झालेले परमबीर सिंग यांनी गेल्या वर्षी २९ फेब्रुवारीला मुंबईच्या पोलीस दलाची सूत्रे हाती घेतली होती. त्यांनी कोरोना परिस्थिती, अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या, टीआरपी घोटाळा, अर्णब गोस्वामी प्रकरण हाताळले होते. त्यामुळे निवृत्तीपर्यंत म्हणजे ३० जून २०२२ पर्यंत तेच कार्यभार सांभाळतील अशी अपेक्षा होती. मात्र स्फोटक कार प्रकरणात मुंबई पोलीस दलाच्या प्रतिमेला तडा गेल्याने त्यांना पदावरून हटविण्याशिवाय सरकारपुढे दुसरा पर्याय नव्हता.

डीजीपी ते आयुक्त बनणारे नगराळे पहिले अधिकारी-  महासंचालक पदावरून मुंबई पोलीस आयुक्तपदी निवड होण्याची ही पहिलीच घटना आहे. नगराळेंकडे डीजीपीचा तात्पुरता पदभार असला तरी यूपीएससी निवड समितीच्या शिक्कामोर्तबानंतर त्यांच्याकडे पद राहणार होते. 

-  त्यांच्याकडे अनपेक्षितपणे मुंबई आयुक्तपदाची जबाबदारी आली. ते पुढच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये निवृत्त होतील. त्यामुळे त्यांना आयुक्त म्हणून १९ महिन्यांचा कार्यभार मिळेल. सरकारची इच्छा असल्यास त्यानंतरही मुदतवाढ मिळू शकते.

नगराळे यांची प्रशासनावर पकड-  हेमंत नगराळे हे १९८७ च्या आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावतीचे ते रहिवासी आहेत. -  प्रशासनावर पकड असलेले अधिकारी म्हणून ओळखले जाणारे नगराळे यांच्याकडे गेल्या ७ जानेवारीला पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला होता. -  त्यापूर्वी त्यांनी २०१४ मध्ये मुंबईचे सहआयुक्त (प्रशासन) म्हणून तर जवळपास महिनाभर आयुक्तपदाची अतिरिक्त जबाबदारी सांभाळली. - २०१६ ते २०१८ या काळात ते नवी मुंबईचे आयुक्त होते. तेथून पदोन्नतीवर ऑक्टोबर २०१८ मध्ये त्यांची विधी व तंत्रज्ञ विभागात महासंचालक पदावर बदली झाली. डीजीपीचा कार्यभार सांभाळत असताना अवघ्या ७० दिवसांत त्यांच्यावर मुंबई पोलीस दलाची धुरा सोपविण्यात आली.

मुंबई पोलीस सध्या कठीण समस्येतून जात आहे.  पोलिसांची मलीन झालेली प्रतिमा सर्वांच्या सहकार्याने सुधारण्याचा प्रयत्न करणार आहे. एका महत्त्वाच्या प्रकरणाचा एनआयए, एटीएस त्यांच्या पद्धतीने योग्य तपास करत आहे.  यात जे कोणी दोषी आहे त्यांच्यावर योग्य कारवाई करण्यात येईल.    हेमंत नगराळे, पोलीस आयुक्त मुंबई

रजनीश सेठ यांच्याकडे पाेलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार -पोलीस महासंचालक पदाची अतिरिक्त जबाबदारी साेपविण्यात आलेले रजनीश सेठ हे १९८८च्या आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत. गेल्या वर्षी २९ फेब्रुवारीपासून ते लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख म्हणून काम पाहत होते. यापूर्वी त्यांनी राज्याचे अप्पर महासंचालक (कायदा व सुव्यवस्था), गृह विभागाचे विशेष सचिव, मुंबईचे सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. डिसेंबर २०२३ पर्यंत त्यांचा सेवा कार्यकाळ आहे.

संजय पांडे यांची होमगार्डमधून राज्य सुरक्षा महामंडळाच्या महासंचालकपदी बदलीज्येष्ठ आयपीएस अधिकारी संजय पांडे गेल्या सहा वर्षांपासून होमगार्डमध्ये कार्यरत होते. परमबीर सिंग यांची त्या ठिकाणी बदली केल्याने पांडे  यांची राज्य सुरक्षा महामंडळात बदली करण्यात आली. या ठिकाणचा अतिरिक्त पदभार गेल्या वर्षीच्या ९ डिसेंबरपासून त्यांच्याकडेच होता. 

टॅग्स :sachin Vazeसचिन वाझेPoliceपोलिसParam Bir Singhपरम बीर सिंगMansukh Hirenमनसुख हिरणMukesh Ambaniमुकेश अंबानी