नवी मुंबईतल्या रबाळे एमआयडीसीत भीषण आग
By Admin | Updated: June 15, 2016 23:09 IST2016-06-15T23:09:56+5:302016-06-15T23:09:56+5:30
रबाळे एमआयडीसी परिसरातल्या एका केमिकल कंपनीला भीषण आग लागली आहे.

नवी मुंबईतल्या रबाळे एमआयडीसीत भीषण आग
ऑनलाइन लोकमत
नवी मुंबई, दि. 15- नवी मुंबईतल्या आगीचं सत्र थांबण्याची काहीच चिन्हे नाहीत. रबाळे एमआयडीसी परिसरातल्या एका केमिकल कंपनीला भीषण आग लागली आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
आग हळूहळू पसरत असून, आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाल्याची माहिती समोर येते आहे. अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत.