शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
4
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
5
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
6
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
7
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
8
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
9
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
10
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
11
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
12
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
13
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
14
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
15
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
16
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
17
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
18
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
19
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
20
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
Daily Top 2Weekly Top 5

झगडून घेतलेली जागा राखताना शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 06:00 IST

हा मतदारसंघ आधीचा डहाणू. पुनर्रचनेत तो पालघर या नावाने अस्तित्वात आला. सुरुवातीपासून हा परिसर भाजपाचा-खासकरून संघ परिवाराचा प्रभाव राखणारा होता.

युती करताना भारतीय जनता पार्टीशी झगडून मिळवलेला पालघर मतदारसंघ राखण्यास शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. ठाण्याप्रमाणेच भाजपाचा प्रभाव असलेला हाही मतदारसंघ शिवसेनेला सोडावा लागल्याने भाजपासह संघ परिवारात प्रचंड नाराजी आहे. ती गृहीत धरूनच शिवसेनेला येथे लढत द्यावी लागेल. ही नाराजी शिवसेनेसाठी मोठी डोकेदुखी ठरू शकते.

हा मतदारसंघ आधीचा डहाणू. पुनर्रचनेत तो पालघर या नावाने अस्तित्वात आला. सुरुवातीपासून हा परिसर भाजपाचा-खासकरून संघ परिवाराचा प्रभाव राखणारा होता. इथे संघाने अनेक वर्षांच्या अथक मेहनतीने वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून चांगले नेटवर्क तयार केले आहे. तेथे त्यांना आधी आव्हान होते ते मार्क्सवाद्यांचे. नंतर हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने वसई-विरारचा पट्टा ओलांडून येथे पाय रोवले. पण मोदी लाटेत तब्बल ५३ टक्के म्हणजे पाच लाख ३३ हजार २०१ मते मिळवत चिंतामण वनगा यांनी तो मिळवला. त्यांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांच्या मुलाला उमेदवारी देण्यावरून भाजपात सुरू असलेल्या घोळाचा फायदा उठवत शिवसेनेने त्यांना प्रवेश देत मतदारसंघावर दावा सांगितला. त्यामुळे काँग्रेसमधून राजेंद्र गावितांना फोडून त्यांना संधी देत भाजपाने प्रचंड ताकद लावत हा मतदारसंघ राखला. मुख्यमंत्र्यांनी प्रतिष्ठा पणाला लावलेला हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेल्याने गेली दोन दशके येथे काम करणाऱ्यांचा हिरमोड झाला आहे. त्याचीच परिणती सामूहिक राजीनाम्यात होते आहे. चिंतामण वनगा यांना जरी पाच लाखांवर मते मिळाली असली, तरी पोटनिवडणुकीत वेगळे लढताना भाजपाने २ लाख ७२ हजार, तर शिवसेनेने २ लाख ३३ हजार मते मिळवली. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या मतांची ताकद स्पष्ट झाली. बहुजन विकास आघाडीला गेल्या तिन्ही निवडणुकांत येथे साधारण सव्वादोन लाखाच्या घरात मते मिळाली आहेत. शिवसेनेतर्फे याहीवेळी श्रीनिवास वनगा यांनाच संधी दिली जाईल. पण त्यांना भाजपा-संघ परिवाराची सरसकट मते मिळतील की नाही, हे सध्या सांगणे कठीण आहे.

काँग्रेस आघाडीने ही जागा बविआला सोडली तर शिवसेना विरूद्ध बविआ अशी थेट लढत होण्याची शक्यता आहे. त्यातही मार्क्सवाद्यांचा पाठिंबा मिळवण्याची खेळी यशस्वी झाली; तर बविआ, काँग्रेस आणि मार्क्सवाद्यांची मिळून मतांत साधारण लाखाची भर पडेल, असे राजकीय आडाखे बांधले जात आहेत. या मतदारसंघात स्वतंत्रपणे राजकारण करतानाही बविआने कधी सत्ताधाऱ्यांविरोधात भूमिका घेतलेली नाही. पण त्यासाठी हाती मतदारसंघ असणे आवश्यक असल्याने बविआला येथे निकराने लढावे लागेल. दोन्ही पक्षांच्या या गरजा लक्षात घेतल्या तर येथील निवडणूक रंगतदार होईल. या दोन्ही पक्षांकडे कार्यकर्त्यांची फळी, संघटनात्मक ताकद आणि स्थानिक स्वराज्य संस्थेत प्रभाव असल्याने बहुजन आघाडी कोणता उमेदवार देते यावर लढतीचे चित्र अवलंबून राहील.सध्याची परिस्थितीआदिवासी आणि मराठा आरक्षणामुळे नाराज कुणबी समाजाची मते कोणाच्या पारड्यात पडतात, त्याकडे लक्ष. बुलेट ट्रेनसह विविध प्रकल्पांसाठी होणारे भूसंपादन, त्याचा फटका बसलेल्यांची नाराजी हाही निवडणुकीत कळीचा मुद्दा. हितेंद्र ठाकुरांना विरोध करणारे, पूर्वी शिवसेनेचे नेते असलेले आणि श्रमजिवींच्या नावे आदिवासींची ताकद हाती असलेले विवेक पंडित यांनी पोटनिवडणुकीत भाजपाला मदत केली होती. आता त्यांच्यावर सेनेची भिस्त आहे. एमएमआरडीएपरिसराची हद्द वाढवून त्यात वसई आणि पालघरचा समावेश करीत बिल्डर, उद्योजकांतील नाराजी कमी करण्याचा भाजपाकडून प्रयत्न.

 

टॅग्स :palgharपालघर