शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

Mahrashtra Election 2019 : Video : उदयनराजेंचा शरद पवारांवर पलटवार, साताऱ्यातील सभेला 'ही' उपमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2019 17:22 IST

Mahrashtra Election 2019 : Video : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी साताऱ्यात मुसळधार पावसात घेतलेल्या सभेमुळे सोशल मीडियावर वातावरण पवारमय झालेले दिसत आहेत

सातारा - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रचारसभांच्या झंझावाताची चर्चा राज्यभर चांगली रंगली. तसेच, पायाला जखमा असतानाही वयाच्या 80 व्या वर्षी शरद पवार पायाला भिंगरी लावल्यागत फिरत असल्याचे फोटोही सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. आता, साताऱ्यातील लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारसभेत शरद पवारांनी चक्क मुसळधार कोसळणाऱ्या पावसात सभेला संबोधित केले. पवारांची साताऱ्यात मुसळधार पावसातील सभा देशभर चर्चेचा विषय ठरली. त्यामुळे सोशल मीडियावर वातावरण पवारमय झालंय. आता, उदयनराजे भोसलेंनी पवाराच्या या सभेचा आपल्या शब्दात समाचार घेतलाय.  

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी साताऱ्यात मुसळधार पावसात घेतलेल्या सभेमुळे सोशल मीडियावर वातावरण पवारमय झालेले दिसत आहेत. त्यामुळे साताऱ्यातील खासदारकीच्या पोटनिवडणुकीचे उमेदवार चित्र बदलल्याची चर्चा जोरात रंगली आहे. त्यानंतर, आज साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी पवारांना प्रत्युत्तर दिले. तसेच, पवारांच्या पावसातील सभेला काळू-बाळूचा तमाशा असे म्हटलंय. 

साताऱ्यातील सभेत पडलेला पाऊस हा शुभ शकून नसून काँग्रेस आणि राष्ट्रवादीची घाण धुवून टाकण्याची सुरूवात झाल्याचे संकेत असल्याचे उदयनराजेंनी म्हटलंय. साताऱ्यातील सभा म्हणजे जनतेला काळू-बाळूचा तमाशा वाटला. या तमाशाला, ढगाला लागली कळ, काँग्रेस राष्ट्रवादीची मत गळ आणि धनुष्यबाण-कमळाची मतं फुलं, असंच म्हणाव लागेल, उदयनराजेंनी कागदावर भाषण लिहून आणलं होतं, ते भाषण वाचून दाखवताना पवारांना ती माझी चूक होती का? असे अनेक प्रतिप्रश्न पवारांना केले आहेत.दरम्यान, पवारांनी साताऱ्यातील सभेत बोलताना मी लोकसभा निवडणुकांवेळी चूक केली होती, ती चूक दूरुस्त करण्याची वेळ आली असून घराघरातील तरुण वाट पाहत असल्याचे त्यांनी म्हटलं होतं. 

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसsatara-pcसाताराsatara-acसाताराAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019