महानोरांच्या घरावर अज्ञातांचा हल्ला
By Admin | Updated: May 9, 2015 01:28 IST2015-05-09T01:28:58+5:302015-05-09T01:28:58+5:30
पळासखेडे (ता. सोयगाव) येथील कविवर्य ना.धों. महानोर यांच्या शेतातल्या ‘पानकळा’ या निवासस्थानी पद्म आणि अन्य पुरस्कार आणि स्मृतिचिन्हे व
महानोरांच्या घरावर अज्ञातांचा हल्ला
जळगाव/ सोयगाव : पळासखेडे (ता. सोयगाव) येथील कविवर्य ना.धों. महानोर यांच्या शेतातल्या ‘पानकळा’ या निवासस्थानी पद्म आणि अन्य पुरस्कार आणि स्मृतिचिन्हे व कागदपत्रांची अज्ञातांनी नासधूस केल्याचे शुक्रवारी उघडकीस आले. या प्रकरणी कुठलीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही; परंतु सोयगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.
‘पानकळा’ या निवासस्थानी ६ मे रोजी रात्री कुणी तरी चोरी करण्याचा प्रयत्न केला. दोन खोल्यांचे कुलूप तोडण्यात आले. एक सुटकेस उघडून त्यामधील फोटो व इतर साहित्य अस्ताव्यस्त फेकण्यात आले. मौल्यवान वस्तू असलेल्या खोलीचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. कवी महानोर यांच्यासह सर्व कुटुंबीय विवाहसोहळ्यासाठी जळगावला गेल्याची संधी साधून अज्ञातांनी हा प्रकार केल्याचे प्रफुल्ल महानोर यांनी सांगितले.
हा प्रकार गंभीर स्वरूपाचा आहे, बरे झाले मी आणि पत्नी घरी नव्हतो. पण आपला कुणावरही संशय नाही, असे महानोर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर जळगाव येथील त्यांच्या निवासस्थानी ‘लोकमत’ने संपर्क साधला आणि वस्तुस्थिती जाणून घेतली. पोलिसांच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार झाल्याचा आरोपही त्यांनी केला.
महानोर म्हणाले की, गुरुवारी सायंकाळी या घटनेची माहिती मिळाली व नातीचे लग्न नुकतेच आटोपलेले असल्याने चिरंजीव बाळासाहेब हे सकाळपासून पळासखेडे येथे गेलेले आहेत, ते आल्यावर चर्चा करून सोयगाव पोलीस ठाण्यात तक्रार करण्याबाबत निर्णय घेऊ, असे महानोर म्हणाले.
ही घटना चोरीच्या हेतूने झालेली नाही. कारण परिसरात आणि शेतात असलेल्या या एकमेव ४ खोल्यांच्या घरात व्हीसीआर, २ टीव्ही संच तसेच पितळेची तसेच स्टीलची खूप भांडी आहेत, चोरीचा हेतू असता तर दोन लाखांचा ऐवज लंपास होऊ शकला असता, असा दावा त्यांनी केला.