हवेली तालुक्यात महिलाराज
By Admin | Updated: June 9, 2017 00:59 IST2017-06-09T00:59:25+5:302017-06-09T00:59:25+5:30
३० महिला प्रवर्ग आरक्षणे पोलीस पाटीलपदासाठी निश्चित झाल्याने हवेलीत महिलांचा पोलीस पाटीलपदी राज राहणार हे निश्चित आहे.

हवेली तालुक्यात महिलाराज
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणी काळभोर : हवेलीतील ५९ ग्रामपंचायतींपैकी ३० महिला प्रवर्ग आरक्षणे पोलीस पाटीलपदासाठी निश्चित झाल्याने हवेलीत महिलांचा पोलीस पाटीलपदी राज राहणार हे निश्चित आहे.
हवेली तालुक्यातील ५९ गावांमधील पोलीस पाटील भरती प्रक्रियेतील आरक्षण सोडत हवेलीच्या उपविभागीय महसूल अधिकारी ज्योती कदम यांच्या उपस्थितीत पार पडली. याप्रसंगी हवेलीचे तहसीलदार प्रशांत पिसाळ, पिंपरी-चिंचवडच्या अप्पर तहसीलदार गीतांजली शिर्के, संतोष भालेरे, संजय शिंदे, शेखर शिंदे, मिलिंद पोळ, तलाठी ए. एच. वाघमारे, सी. पी. तांबोळी, अतुल गिते, दीपक चाचर उपस्थित होते. या वेळी नागरिकांच्या सर्व शंकाचे निरसन प्रशासनाकडून करण्यात आल्याने सोडत प्रक्रिया शांततेत पार पडली.
हवेली तालुक्यातील पोलीस पाटील आरक्षण पुढीलप्रमाणे :
अनुसूचित जाती : थेऊर, हिंगणगाव, कदमवाकवस्ती, सोरतापवाडी (महिला राखीव), मामुर्डी, विठ्ठलनगर (पुरुष राखीव).
अनुसूचित जमाती : नायगाव, थोपटेवाडी (महिला राखीव), किन्हई, सांगवी सांडस, सांबरेवाडी, खामगाव टेक (पुरुष राखीव).
विशेष मागास प्रवर्ग : डोणजे (महिला राखीव), मणेरवाडी (पुरुष राखीव).
विमुक्त जाती : आंबी : विशेष मागास प्रवर्ग महिला, तळेरानवाडी : विशेष मागास प्रवर्ग
भटक्या जमाती : गोगलवाडी-भटक्या जमाती (ब) महिला, शिंदेवाडी-भटक्या जमाती (ब) खुला, अवसरेनगर-भटक्या जमाती (क) महिला, तानाजीनगर-भटक्या जमाती (क) खुला, तरडे -भटक्या जमाती (ड) महिला, नांदोशी-भटक्या जमाती (क) खुला.
इतर मागास वर्ग : कोलवडी, साष्टे, पिंपरी सांडस, आळंदी म्हातोबाची, मोगरवाडी (महिला राखीव), खानापूर, बुर्केगाव, भवरापूर, होळकरवाडी, माळीनगर, कल्याण, अष्टापूर, सणसनगर (इतर मागास वर्ग खुला).
खुला प्रवर्ग यादी : बकोरी-खुला प्रवर्ग महिला, फुलगाव : खुला प्रवर्ग महिला, गावडेवाडी-खुला प्रवर्ग महिला, मुरकुटेनगर-खुला प्रवर्ग महिला, वाडे बोल्हाई-खुला प्रवर्ग महिला, वडकी-खुला प्रवर्ग महिला, कोंढणपूर-खुला प्रवर्ग महिला, औताडे हांडेवाडी : खुला प्रवर्ग महिला, मालखेड-खुला प्रवर्ग महिला, कोरेगाव मूळ- खुला प्रवर्ग महिला, मोरदरवाडी-खुला प्रवर्ग महिला, सोनापूर-खुला प्रवर्ग महिला, आव्हाळवाडी : खुला प्रवर्ग महिला, आर्वी- खुला प्रवर्ग, बिवरी-खुला प्रवर्ग, खडकवासला- खुला प्रवर्ग, कुंजीरवाडी-खुला प्रवर्ग, श्रीरामनगर- खुला प्रवर्ग, टिळेकरवाडी- खुला प्रवर्ग, पेठ-खुला प्रवर्ग, रहाटवडे-खुला प्रवर्ग, वळती-खुला प्रवर्ग, गोऱ्हे खुर्द-खुला प्रवर्ग, पेरणे-खुला प्रवर्ग.