महेश मोतेवार उस्मानाबाद पोलिसांच्या ताब्यात

By Admin | Updated: January 3, 2016 02:38 IST2016-01-03T02:38:32+5:302016-01-03T02:38:32+5:30

समृद्ध जीवन फुड्स कंपनीचे प्रमुख महेश किसन मोतेवार याला पुणे येथील रूग्णालयातून शनिवारी ‘डिस्चार्र्ज’ देण्यात आला असून, उस्मानाबाद पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे़.

Mahesh Motevar is in the custody of the Osmanabad police | महेश मोतेवार उस्मानाबाद पोलिसांच्या ताब्यात

महेश मोतेवार उस्मानाबाद पोलिसांच्या ताब्यात

उस्मानाबाद : समृद्ध जीवन फुड्स कंपनीचे प्रमुख महेश किसन मोतेवार याला पुणे येथील रूग्णालयातून शनिवारी ‘डिस्चार्र्ज’ देण्यात आला असून, उस्मानाबाद पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे़. 
येणेगूर येथील रेवते अ‍ॅग्रोच्या डेअरीतील फसवणूक प्रकरणात महेश मोतेवार याला उस्मानाबाद पोलिसांनी २८ डिसेंबर रोजी पुणे येथून ताब्यात घेतले होते़ पोलीस कोठडीत
असताना मोतेवार याच्या छातीत दुखू लागल्याने ३० डिसेंबर रोजी जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते़ त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुढील उपचारासाठी त्याला सोलापूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले.
सोलापूर येथून मोतेवार याला नंतर पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचारासाठी रेफर करण्यात आले होते़ दोन दिवस वेगवेगळ्या तपासण्या झाल्यानंतर शनिवारी ‘ससून’मधून मोतेवार याला डिस्चार्ज देण्यात आला़ त्यानंतर उस्मानाबाद पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. (प्रतिनिधी)

Web Title: Mahesh Motevar is in the custody of the Osmanabad police