शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

महायुतीचा निर्णय होणार दिल्लीत; आजच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2024 07:01 IST

Lok Sabha Election 2024: भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीची रखडलेली जागा वाटपाची चर्चा आज (गुरुवारी) दिल्लीत मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असतानाही राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही. महायुती आणि महाविकास आघाडीच्या महत्त्वाच्या बैठका दिल्ली, मुंबईत गुरुवारी होणार आहेत. त्यानंतर निदान फॉर्म्युल्याबाबतचा गोंधळ दूर होईल, अशी अपेक्षा केली जात आहे. 

भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीची रखडलेली जागा वाटपाची चर्चा आज (गुरुवारी) दिल्लीत मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. तीनवेळा जागा वाटपाची ही बैठक रद्द झाल्यानंतर अखेर बैठकीसाठी गुरुवारचा मुहूर्त निघाला आहे. दिल्लीत भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर होणाऱ्या या बैठकीला भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिंदे गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तर राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित राहणार आहेत. भाजपला २८ ते २९, शिवसेनेला १२ ते १३, राष्ट्रवादीला ६ ते ७ तर मनसेला १ जागा मिळतील अशी चर्चा आहे. भाजप जागा वाढवून घेण्यासाठी आग्रही आहे. 

महाराष्ट्राचा जागा वाटपाचा निर्णय व्हायचा आहे. ४८ जागांच्या वाटपाची घोषणा एकाच वेळी होईल. जागांची मागणी करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. शेवटी निवडून येणे हा निकष लक्षात घेऊनच जागा वाटप होईल.- चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष, भाजप

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राज्यात ९ ते १० जागा मिळाव्यात, अशी आमची भूमिका आहे. या संदर्भात बैठकीत सकारात्मक चर्चा होऊन येत्या एक ते दोन दिवसांत अंतिम जागा वाटप जाहीर होईल, असा विश्वास आहे. - सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

टॅग्स :Mahayutiमहायुतीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४