मुंबई - विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुती सरकार स्थापन झालं. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनाच्या सर्व ४८ विभागांना १०० दिवसांचा धोरणात्मक कार्यक्रम आखून दिला होता. त्यात महत्त्वाची नवीन धोरणे, दूरगामी निर्णय आणि लोकाभिमुख उपक्रमांची आणखी सुरू केली. त्यामुळे या ४८ विभागांचा रिपोर्ट कार्ड जारी करण्यात आले आहे. त्यात १२ विभागांनी १०० टक्के गुण मिळवून अव्वल क्रमांक पटकावला आहे तर फक्त २४ टक्के गुण मिळवून एक विभाग नापास झाला आहे.
गेल्या १०० दिवसात या सर्व विभागांनी निश्चित केलेल्या ९०२ धोरणात्मक उद्दिष्टांपैकी ७०६ उद्दिष्टे (७८%) पूर्णतः साध्य केली आहेत तर उर्वरित १९६ उद्दिष्टे पूर्ण होईपर्यंत संबंधित विभाग आपले काम चालूच ठेवतील. एकूण ४८ विभागांपैकी १२ विभागांनी आपली १००% उद्दिष्ट पूर्तता केली आहे तर आणखी १८ विभागांनी ८०% पेक्षा जास्त उद्दिष्टे साध्य केली आहेत. या परिवर्तनशील व सर्वंकष विकासाच्या वाटचालीच्या मोहिमेत सर्व विभागांनी केलेल्या अतिशय प्रभावी कामगिरीबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांनी भविष्यात सुद्धा अशीच चांगली कामगिरी करावी असं कौतुक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
पाहा विभागांचा निकाल