शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणची सर्वात खराब कामगिरी ! देशात नीचांक स्थानी; या अपयशासाठी कोण कारणीभूत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 17:34 IST

Nagpur : स्वतःला आशियातील दुसरी सर्वात मोठी वीज वितरण कंपनी म्हणवून घेणारी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण) आता देशात सर्वांत तळाला पोहोचली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वतःला आशियातील दुसरी सर्वात मोठी वीज वितरण कंपनी म्हणवून घेणारी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण) आता देशात सर्वांत तळाला पोहोचली आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या राष्ट्रीय सर्वेक्षणात, देशातील ५२ वीज कंपन्यांच्या यादीत महावितरण थेट शेवटच्या (५२ व्या) क्रमांकावर फेकली गेली आहे. गेल्या वर्षी १५.५ गुण मिळवणाऱ्या महावितरणला यावर्षी १०० पैकी अवघे १.५ गुण मिळाले असून, कंपनीला 'सी' ग्रेड देण्यात आला आहे. आशियातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वांत मोठ्या कंपनीची 'ऐतिहासिक' घसरण झाली आहे.

महागडी वीज, पण सेवा गायब

देशात सर्वात निकृष्ट कामगिरी असूनही महावितरणचे दर मात्र गगनाला भिडलेले आहेत.घरगुती ग्राहक : ८ ते १३ रुपये प्रति युनिटऔद्योगिक ग्राहक १०८८ रुपये प्रति युनिटव्यावसायिक ग्राहक : तब्बल १८ रुपये प्रति युनिट

इतके पैसे मोजूनही ग्राहकांना वारंवार

खंडित होणारा वीजपुरवठा आणि निकृष्ट सेवेचा सामना करावा लागत आहे. 

सरकारची उदासीनता कारणीभूत ?

गुजरातसारख्या राज्यांनी वीजचोरीवर कडक कारवाई आणि स्मार्ट मीटरिंगद्वारे आपल्या कंपन्या फायद्यात आणल्या आहेत. मात्र, महाराष्ट्रात ऑडिटचे इशारे आणि ग्राहकांच्या तक्रारींकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. जोपर्यंत व्यावसायिक व्यवस्थापन आणि १०० टक्के प्रीपेड स्मार्ट मीटरिंगसारखे उपाय राबवले जात नाहीत, तोपर्यंत सामान्य जनतेची ही 'वीज लूट' थांबणार नाही.

का ठरली 'महावितरण' फेल ?

  • प्रचंड गळती आणि वीजचोरी: महावितरणच्या पुरवठ्यात २४.२ टक्के वीजगळती होते. तर राष्ट्रीय सरासरी केवळ १६.३ टक्के आहे. वीजचोरी, अनधिकृत कृषी पंप आणि कमकुवत अंमलबजावणीमुळे होणाऱ्या या नुकसानीचा भार प्रामाणिक ग्राहकांना जादा बिलाच्या स्वरूपात सोसावा लागत आहे.
  • वसुलीत कमालीचा आळस : देशातील सर्वोत्तम वीज कंपन्या १५ दिवसांत बिलाची वसुली करतात. मात्र, महावितरणला बिल वसुलीसाठी सरासरी २०० दिवस लागतात.
  • आर्थिक गैरव्यवस्थापन : कंपनीवर सध्या २०,००० कोटी रुपयांहून अधिक थकबाकी आहे. ऑडिटर्सनी कंपनीच्या आर्थिक स्थितीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
  • नियोजनाचा अभाव : स्मार्ट मीटर बसवण्यास झालेला विलंब, ग्रामीण भागातील खिळखिळी पायाभूत सुविधा आणि उत्तरदायित्वाचा अभाव यामुळे महावितरणचे कंबरडे मोडले आहे. 
  • राज्यातच तुलना, खासगी कंपन्या उजव्या : एकाच नियामक मंडळाच्या (एमईसीएल) अंतर्गत काम करूनही खासगी कंपन्या आणि महावितरण यांच्यात जमीन-अस्मानाचा फरक आहे.

 

मुंबईतील खासगी कंपन्या जर अव्वल ठरू शकतात, तर महावितरणला ग्रामीण भागाचे कारण पुढे करून आपली जबाबदारी झटकता येणार नाही. हे पूर्णपणे प्रशासकीय अपयश असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Mahavitaran's dismal performance: Bottom of the list nationally, who is responsible?

Web Summary : Mahavitaran, once Asia's second-largest electricity distributor, ranks last nationally due to high costs, poor service, and electricity theft. Despite expensive rates for consumers, power outages are frequent. Inefficient management, delayed smart meters, and substantial financial mismanagement contribute to this decline, contrasting sharply with successful private companies.
टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीजnagpurनागपूरMaharashtraमहाराष्ट्र