शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

महाविकास आघाडीचं सरकार पडणार नाही; चंद्रकांत पाटलांच्या विधानानं सर्वांच्या भुवया उंचावल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 19:51 IST

सरकार पडण्याची डेडलाईन वारंवार देणाऱ्या चंद्रकांत पाटील यांचं विधान

कोल्हापूर: महाविकास आघाडी सरकार पडेल, असं म्हणत सातत्यानं डेडलाईन देणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या एका विधानानं साऱ्यांच्या भुवया उंचावल्या  आहेत. महाविकास आघाडी सरकार पडणार नाही. सत्तेतले पक्ष सरकार पडू देणार नाहीत, असं पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं. ते कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते.

महाविकास आघाडी सरकार लवकरच पडेल असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी आतापर्यंत अनेकदा डेडलाईन दिल्या आहेत. मात्र आता त्यांनी हे सरकार पडणार नसल्याचं म्हटलं आहे. 'सत्तेत असलेले सगळे जण अतिशय हुशार आहेत. त्यांना सत्तेची ताकद माहिती आहे. आपलं सरकार अपघातानं याची त्यांना कल्पना आहे. सरकार आल्यापासून आपण खूप बदल्या करू शकलो. कार्यकर्त्यांना खूष करू शकलो याची सत्तेत असलेल्या पक्षांच्या नेत्यांना कल्पना आहे,' असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

'वर्षानुवर्षे सत्तेत राहिल्यानं सरकारमधील पक्षांना सत्तेची ताकद काय असते याची कल्पना आहे. त्यामुळे ते खूप भांडतील. पण सरकार पडू देणार नाहीत,' असं चंद्रकांत पाटील यांनी पुढे सांगितलं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सध्या सातत्यानं आक्रमक विधान करत आहेत. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादीमध्ये नाराजी आहे. पटोलेंच्या विधानांमुळे सरकारला धोका पोहोचेल का, असा प्रश्न पाटील यांना विचारण्यात आला होता. त्या प्रश्नाला पाटील यांनी उत्तर दिलं.

विरोधकांनी कितीही एकमेकांच्या भेटीगाठी घेऊ द्या, ते कोणाच्याही नेतृत्त्वाखाली निवडणूक लढवू द्या. तरीही आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप चारशेपेक्षा जास्त जागा जिंकेल, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी केला. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची तीन वेळा भेट घेतली. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचीही भेट घेऊन त्यांनी चर्चा केली. त्या पार्श्वभूमीवर पाटील यांनी हे विधान केलं आहे. 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडी