शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

महाविकास आघाडीने केले  २१५ उमेदवार निश्चित! काँग्रेसला ८४, शरद पवार गट व उद्धवसेनेला प्रत्येकी ६५ जागा

By अतुल कुलकर्णी | Updated: October 16, 2024 09:23 IST

आज बुधवारी दिल्लीत काँग्रेसच्या स्क्रीनिंग कमिटीची बैठक होणार आहे. त्यानंतर दोन दिवसांच्या आत ३० लोकांची पहिली यादी काँग्रेसकडून जाहीर केली जाणार आहे.

अतुल कुलकर्णी -मुंबई : महाविकास आघाडीच्या तिन्ही घटक पक्षांमध्ये २१५ जागांवर एकमत झाले आहे. उर्वरित ७३ जागांचे वाटपही येत्या तीन दिवसात अंतिम होईल, असे काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ज्या २१५ जागा निश्चित झाल्या आहेत. त्यात काँग्रेसला ८४, तर शरद पवार गट आणि उद्धवसेनेला प्रत्येकी ६५ जागा देण्यात आल्या आहेत. एक जागा सपाच्या अबू आझमी यांची अंतिम करण्यात आली आहे.आज बुधवारी दिल्लीत काँग्रेसच्या स्क्रीनिंग कमिटीची बैठक होणार आहे. त्यानंतर दोन दिवसांच्या आत ३० लोकांची पहिली यादी काँग्रेसकडून जाहीर केली जाणार आहे. दिल्लीत होणाऱ्या बैठकीसाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, के. सी. वेणुगोपाल, मधुसूदन मिस्त्री यांच्यासोबत रमेश चेन्नीथला, महाराष्ट्रातून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड उपस्थित राहणार आहेत. या २१५ जागा सर्व सहमतीने अंतिम करण्यात आल्या आहेत, असे सांगून तो नेता म्हणाला, उर्वरित ७३ जागीदेखील मित्र पक्षांसह आघाडीतील तीन प्रमुख पक्षांच्याही जागा असतील. ७३ जागांचा अंदाज बघितला, तर सर्वाधिक जागा काँग्रेसला मिळतील, असे चित्र आहे. विदर्भात काँग्रेससाठी, पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या राष्ट्रवादीसाठी, तर मराठवाड्यात ठाकरे यांच्या शिवसेना आणि काँग्रेससाठी जास्त जागा देण्यात आल्या आहेत. मुंबई आणि कोकणात उद्धवसेनेला इतर दोन पक्षांच्या तुलनेत जास्त जागा देण्यात येतील, असेही काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने स्पष्ट केले. महाविकास आघाडीत जागा वाटपावरून वाद असल्याच्या बातम्या येत होत्या. त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने २१५ जागा निश्चित करून उत्तर दिल्याचेही ते म्हणाले. 

उद्यापासून पुन्हा बैठकआघाडीची गेल्या सहा दिवसांपासून थांबलेली जागावाटपाची चर्चा आता गुरुवारपासून पुन्हा सुरू होणार आहे. आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार येत्या २२ तारखेपासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होणार आहे. बैठकीत सर्व जागांचे वाटप होण्याची शक्यता कमीच आहे. १० ते १५ जागांवर शेवटपर्यंत चर्चेचे गुऱ्हाळ सुरू राहील, असे आजचे चित्र आहे.

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारcongressकाँग्रेस