शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मविआ जागावाटपाचे घोडे अडले तरी कुठे? सांगलीवरून तिढा कायम, दोन-तीन दिवसांत घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2024 06:27 IST

शाहू छत्रपतींची गळाभेट घेत ठाकरेंनी दिला प्रचाराचा शब्द

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या गुरुवारी पार पडलेल्या बैठकीतही जागावाटपाबाबत अंतिम निर्णय होऊ शकलेला नाही. त्यामुळे आघाडीची जागावाटपाची गाडी अडलेलीच आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी झालेल्या बैठकीला पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अनिल देशमुख, काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, तर शिवसेना ठाकरे गटाकडून संजय राऊत उपस्थित होते.

प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी, समाजवादी पक्ष, माकप या मित्रपक्षांशी बोलणी सुरू असून या पक्षांशी चर्चा झाल्यानंतर येत्या दोन-तीन दिवसांत जागावाटप जाहीर होईल, असे पटोले यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले. सध्या काँग्रेस उमेदवारांची जी नावे माध्यमात छापून आली आहेत, त्यात काही बदल पाहायला मिळतील. मला सांगितले तर मी लढेन, असेही पटोले यांनी स्पष्ट केले.

आंबेडकरांशी चर्चा

प्रकाश आंबेडकर यांनी सात जागांवर पाठिंबा देण्याबाबत काँग्रेस अध्यक्षांना पत्र लिहिले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आंबेडकरांशी चर्चा केली आहे. 

शाहू छत्रपतींची गळाभेट घेत ठाकरेंनी दिला प्रचाराचा शब्द

शाहू छत्रपती यांना महाविकास आघाडीची उमेदवारी जाहीर झाली आहे. शिवसैनिक पूर्ण ताकदीने त्यांना विजयी केल्याशिवाय राहणार नाहीत. कारण हा महाराष्ट्राच्या तसेच मराठी अस्मितेचा प्रश्न आहे. छत्रपतींच्या प्रचाराला तर येऊच शिवाय विजयाच्या सभेलाही नक्की येणार असल्याची ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी कोल्हापुरातील न्यू पॅलेस येथे झालेल्या चर्चेवेळी दिली.  ठाकरे यांनी गुरुवारी दुपारी शाहू छत्रपतींची गळाभेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यांच्यासोबत तेजस ठाकरे, खासदार संजय राऊत, मिलिंद नार्वेकर होते. यावेळी बैठकीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील व राज्यातील राजकीय परिस्थितीवर उभयतांनी चर्चा केली.

घराण्यांचे घनिष्ठ संबंध

कोल्हापूरला येऊन शाहू महाराज यांची भेट घेतली. तुम्हाला आणखी काही सांगण्याची आवश्यकता नाही. ठाकरे कुटुंबीय व छत्रपती शाहू महाराजांचे ऋणानुबंध माझ्या आजोबांपासूनचे आहेत. मला आनंद आहे की याही आणि पुढील पिढीत हे घनिष्ठ संबंध जपले जातील, असे ठाकरे यांनी सांगितले.

सांगलीबाबत काँग्रेस-ठाकरे गट आग्रही  

सांगलीच्या जागेवर अजून चर्चा पूर्ण झालेली नाही, असे सांगत त्या ठिकाणी आघाडीतील नेत्याने जाऊ नये असा आघाडी धर्म असतो. उद्धव ठाकरेंचा  महाराष्ट्रभर दौरा सुरू आहे, योगायोगाने ते सांगलीला गेले असतील, ते कशासाठी गेले हा त्यांचा प्रश्न आहे, अशा शब्दांत पटोले यांनी ठाकरेंच्या सांगली दौऱ्यावर नाराजी व्यक्त केली. यावरून सांगलीचा तिढा अजून सुटला नसल्याचे स्पष्ट आहे. या जागेवर काँग्रेस आणि ठाकरे गटाचा दावा अजून कायम आहे. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Mahavikas Aghadiमहाविकास आघाडी