सातासमुद्रापलीकडील परदेशीच महात्मा गांधींचे ‘फॉलोअर्स’
By Admin | Updated: July 10, 2016 04:35 IST2016-07-10T04:35:38+5:302016-07-10T04:35:38+5:30
महात्मा गांधींनी स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाचे योगदान दिले. मात्र, आजही पुस्तकातले धडे सोडले, तर देशातील तरुणपिढीला या महात्म्याबद्दल माहीत असणे कठीण आहे.

सातासमुद्रापलीकडील परदेशीच महात्मा गांधींचे ‘फॉलोअर्स’
- स्नेहा मोरे, मुंबई
महात्मा गांधींनी स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाचे योगदान दिले. मात्र, आजही पुस्तकातले धडे सोडले, तर देशातील तरुणपिढीला या महात्म्याबद्दल माहीत असणे कठीण आहे. मात्र, आजही सातासमुद्रापलीकडील परदेशी नागरिक गांधींना समजण्याविषयी अधिक उत्सुक असल्याचे दिसून आले आहे. मुंबई सर्वोदय मंडळाच्या संकेतस्थळाला भेट देण्यात परदेशी नागरिक अग्रेसर आहेत.
मुंबई सर्वोदय मंडळाच्या ँhttp://www.mkgandhi.org या संकेतस्थळावर गांधींविषयी संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. गांधींचे विचार, साहित्यसंपदा, त्यांची भाषणे, जीवनप्रवास, संस्था अशी सर्व
माहिती परिपूर्ण पद्धतीने देण्यात आली आहे.
हे संकेतस्थळ गांधींना जाणून घेण्यासाठी विद्यार्थी, संशोधक, सामाजिक कार्यकर्ते यांकरिता उत्तम माध्यम आहे. त्यामुळे दरसेंकदागणिक या संकेतस्थळाला देशभरातून तसेच सातासमुद्रापारहूनदेखील अनेक नागरिक भेट देत असतात. यात मे २०१६मध्ये अमेरिकेतून सर्वाधिक म्हणजे १ लाख ७८ हजार ११ व्यक्तींनी संकेतस्थळाला भेट दिल्याची नोंद आहे. दुसरे स्थान भारताने पटकाविले असून, १ लाख ५२ हजार २१९ देशवासीयांनी या संकेतस्थळाला भेट दिली. त्यानंतर, ग्रेटब्रिटनमधून ७ हजार ७०१, जर्मनीतून ५ हजार ६४९, स्पेनमधून ५ हजार नागरिकांनी संकेतस्थळाला भेट दिली आहे.
जून २०१६मध्ये देशातील १ लाख ९३ हजार ९६८ व्यक्तींनी या संकेतस्थळाला भेट दिली. त्यानंतर, दुसऱ्या स्थानी अमेरिकेतील १ लाख ८० हजार ११५ व्यक्तींनी या संकेतस्थळाला भेट दिल्याची नोंद आहे. त्यानंतर, जर्मनी ९ हजार २५४, ग्रेटब्रिटनमधून ५ हजार ८७४ आणि चीनमधून ४ हजार ३८४ नागरिकांनी या संकेतस्थळाला भेट दिली आहे.
साहित्य संपदाही ‘हिट’
मुंबई सर्वोदय मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असणाऱ्या साहित्यसंपदेलाही सर्वाधिक पसंती मिळत आहे. यात जून महिन्यात एकूण २९७ आणि मे महिन्यात २९५ पुस्तके डाउनलोड करण्यात आली. त्यात ‘टॉप’ पुस्तकांमध्ये ‘सत्याचे प्रयोग’, ‘इन्सेस आॅफ हिंदुइझम’, ‘हिंद स्वराज’, ‘गांधी रिलेव्हन्स’, ‘स्टोरी आॅफ माय लाइफ’, ‘माइंड आॅफ महात्मा गांधी’, ‘गांधीजी आॅन खादी’, ‘गांधी बायोग्राफी फॉर बिगिनर्स’ अशा पुस्तकांचा समावेश आहे.
३० सेकंदांना १,९२,३१४व्हिजिटर्स
महात्मा गांधींविषयी जाणून घेण्यासाठी जगभरातून या संकेतस्थळाला नागरिक भेट देतात. त्यात ३० सेकंदांना १ लाख ९२ हजार ३१४ व्यक्तींनी जून महिन्यात भेट दिली, तर मे महिन्यात ३० सेकंदांना हेच प्रमाण १ लाख ८३ हजार ९८९ एवढे होते.
(आकडेवारी - २०१६)
महिनेव्हिझिटर्सची संख्या
जानेवारी२ लाख ७६ हजार ५८२
फेब्रुवारी२ लाख २८ हजार १७६
मार्च २ लाख ९ हजार ८५७
एप्रिल २ लाख ९ हजार २१८
मे २ लाख १९ हजार ४५७
जून २ लाख २९ हजार ६२६