शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

#Mahashivratri2018 : महाशिवरात्रीनिमित्त आज आणि उद्या अशी कराल महादेवाची पूजा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2018 11:45 IST

फार वर्षांनंतर हा योग जुळून आला आहे आणि सलग दोन दिवस महाशिवरात्री आली आहे. या दोन दिवसांत महादेवाची आराधना योग्य रितीने होणं आवश्यक आहे.

ठळक मुद्देमहाशिवरात्रीच्यादिवशी गरिबांना अन्नदान करून महादेवाची उपासना करावी.  गाईला हिरवा चारा किंवा पेंड भरवल्यास तुमच्या आयुष्यात सुख आणि समृद्धी येते.महाशिवरात्रीला धनप्राप्तीसाठी अनेक भक्त महादेवाची पुजा करतात.

मुंबई : महाशिवरात्रीनिमित्त यावर्षी महासंयोग जुळून आल्याने १३ व १४ फेब्रुवारी या दोन्ही दिवशी महाशिवरात्री साजरी केली जाईल. ज्योतिषशास्त्रानुसार १३ फेब्रुवारीला म्हणजे आज प्रदोष व चतुर्दशीदेखील आहे त्यामुळे आजच्या दिवशी उपवास केल्याने अधिक लाभ होऊ शकतो. फाल्गुनातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री साजरी केली जाते. १३ फेब्रुवारी मंगळवार रात्री १० वाजून २२ मिनिटांनी चतुर्दशीची सुरूवात होऊन ती १४ फेब्रुवारी रात्री १२ वाजून १७ मिनिटांपर्यंत असेल. त्यामुळे या काळात जर महादेवाला प्रसन्न करायचं असेल तर हे गोष्टी नक्की करून बघा.

आणखी वाचा - Mahashivratri2018 : उपवास करणे आरोग्यासाठी उपायकारक, जाणून घ्या 10 फायदे

महाशिवरात्रीनिमित्त महादेवाची पूजा किंवा उपवास केलात तर या गोष्टी साध्य करता येतील. त्यामुळे त्याची आराधना करताना या गोष्टींची घ्या काळजी -

  • लग्नासंबंधी अडचणींसाठी

लग्नकार्यासंबंधी अडचणी उद्भवत असतील तर महाशिवरात्रीला शिवलिंगावर केसर आणि दुधाचा अभिषेक करावा. त्याची रितसर पुजा करावी. याने लवकर लग्नगाठी जुळतात असं मानलं जातं.

  • धनप्राप्ती

असं म्हणतात आपण जेवढं देत राहतो तेवढंच आपल्याकडे येत राहतं. म्हणजेच ज्याची ‘दानत’ असते त्यालाच ‘बरकत’ असते. म्हणून महाशिवरात्रीला धनप्राप्तीसाठी अनेक भक्त महादेवाची पुजा करतात. ध्यानधारणा किंवा उपासना करताना भुतदया म्हणून प्राण्यांना व पक्ष्यांना अन्नदान करावं. यातून त्या मुक्या जीवांचे आशिर्वाद आपल्याला मिळतात. तसंच आपल्याकडे संपन्नता, समृध्दता आणि भरभराट राहते.

आणखी वाचा - Mahashivratri2018 : महाशिवरात्रीनिमित्त जाणून घ्या 12 ज्योतिर्लिंगांची माहिती...

  • अपत्यप्राप्ती

महाशिवरात्रीला शिवलिंगाची पूजा करून मनातील इच्छा सांगून गरिबाला, गरजूला किंवा मुक्या प्राण्यांना अन्नदान किंवा वस्त्रदान करावं. भगवान शंकरांची उपासना वंशवाढीसाठी केल्यास त्याचं फळ मिळतं आणि घरात अपत्यप्राप्ती होते असं म्हणतात.

  • सुख आणि समृद्धीसाठी

महाशिवरात्रीला गाईला हिरवा चारा किंवा पेंड भरवल्यास तुमच्या आयुष्यात सुख आणि समृद्धी येते. घरावर किंवा कुटुंबावर आलेल्या संकटांच निवारण होतं.

आणखी वाचा - Mahashivratri2018: महाशिवरात्रीला 'या' 12 गोष्टी करू नका!

  •  मन:शांतीसाठी

भगवान शंकराच्या उपासनेत ‘ओम नम: शिवाय’ या मंत्राचा जप करून शिवलिंगावर बेलपत्राने अभिषेक करावा. तसंच २१ बेलाच्या पानांवर चंदनाने ‘ओम नम: शिवाय’ लिहून ते शिवलिंगावर अर्पण करावेत.

  • कौटुंबिक सुखासाठी

महाशिवरात्रीच्यादिवशी गरिबांना अन्नदान करून महादेवाची उपासना करावी.  आपल्या घरातील किंवा कुटुंबातील कलह किंवा वाद कमी होऊन पारिवारीक सुख मिळते. तसंच ब्राह्मणाच्या सल्ल्यानुसार घरात शिवलिंगाची स्थापना करून नियमितपणे त्यावर जलाभिषेक करावा, यामुळे घरात संपत्तीची आवक होते आणि घरात लक्ष्मी टिकून राहते.

टॅग्स :Mahashivratriमहाशिवरात्रीIndiaभारतMumbaiमुंबई