शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील १९५० गृहसंकुलांच्या बांधकामांना महारेराची स्थगिती; बँक खातीही गोठवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 07:43 IST

आणखी ३४९९ प्रकल्पांवर कारवाईची टांगती तलवार

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : प्रकल्पपूर्ततेसाठीची दिलेली तारीख उलटून गेली तरी महारेराकडे कोणतीही माहिती अपडेट न करणाऱ्या राज्यातील १० हजार ७७३ प्रकल्पांना महारेराने कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यापैकी १९५० प्रकल्पांवर आता प्रकल्प स्थगितीची कारवाई करण्यात आली असून त्यांचे बँक खाते गोठवण्यात आले आहे. शिवाय प्रकल्पाशी संबंधित व्यवहारांवरही निर्बंध लादण्यात आले आहेत. शिवाय काहीही प्रतिसाद देत नसलेल्या आणखी ३४९९ प्रकल्पांवर कारवाईची प्रक्रियाही महारेराकडून सुरू करण्यात आली आहे.

गेल्या महिन्यात कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्यानंतर त्यांना अपेक्षित माहिती देण्यासाठी  ३० दिवसांची वेळ देण्यात आली. नोटिसींना ५३२४ प्रकल्पांनी प्रतिसाद दिला. यापैकी ३५१७ प्रकल्पांनी ओसी सादर केली, तर ५२४ प्रकल्पांनी प्रकल्पांच्या मुदतवाढीसाठी अर्ज केले. प्रतिसाद देणाऱ्या १२८३ प्रकल्पांच्या कागदपत्रांची सध्या छाननी सुरू आहे.

  • महारेरा नोंदणी क्रमांकासाठी अर्ज करताना प्रत्येक बिल्डरला प्रकल्प कधी पूर्ण होणार, याची तारीख प्रस्तावात नोंदवावी लागते.
  • प्रकल्प अपूर्ण असेल तर मुदतवाढीसाठी प्रक्रिया सुरू करावी लागते.
  • प्रकल्प सुरू करण्यातच काही अडचणी असल्यास प्रकल्प रद्द करण्यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे.
  • प्रत्येक बिल्डरला तिमाही /वार्षिक अशी माहिती द्यावी लागते.

काय होते कारवाई?

  • प्रकल्पाची नोंदणी रद्द, प्रकल्प स्थगित करणे
  • प्रकल्पावर दंडात्मक कारवाई
  • घराच्या खरेदी-विक्री व्यवहाराची नोंदणी न करण्याच्या सूचना सह जिल्हा निबंधकांना देणे
  • प्रकल्पाचे बँक खाते गोठवणे

एकूण स्थगित प्रकल्प - ४५ 

जिल्हा    रद्द प्रकल्प

  • अहिल्यानगर    १
  • छ. संभाजीनगर    १
  • कोल्हापूर    ३
  • मुंबई उपनगर    ४
  • नागपूर    १
  • नाशिक    ४
  • पालघर    ५
  • पुणे    १४
  • रायगड    ६
  • रत्नागिरी    १
  • सातारा    ३
  • ठाणे    २

या कारवाईमागे घरखरेदीदारांच्या हितांचे रक्षण व्हावे हा हेतू आहे. प्रत्येक गृहनिर्माण प्रकल्पाने, कायद्यानुसार घरखरेदीदारांना प्रकल्पस्थिती कळावी यासाठी महारेराच्या वेबसाइटवर नियमितपणे अद्ययावत करणे बंधनकारक आहे. परंतु प्रत्यक्षात असे होत नव्हते. सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर यात सुधारणा होताना दिसते. ग्राहकहितार्थ अशा प्रकल्पांवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे.- मनोज सौनिक, अध्यक्ष, महारेरा

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रbankबँक