'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार सोहळा आज ‘आयबीएन लोकमत’वर

By Admin | Updated: April 10, 2016 04:52 IST2016-04-10T04:27:53+5:302016-04-10T04:52:34+5:30

अवघ्या महाराष्ट्राला उत्सुकता लागलेल्या ‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ कार्यक्रमाचे विशेष प्रक्षेपण रविवार, १० एप्रिल रोजी रात्री ८ वाजता ‘आयबीएन लोकमत’ वाहिनीवरून होणार आहे.

'Maharashtrian of the Year' award ceremony today, on 'IBN Lokmat' | 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार सोहळा आज ‘आयबीएन लोकमत’वर

'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार सोहळा आज ‘आयबीएन लोकमत’वर

मुंबई : अवघ्या महाराष्ट्राला उत्सुकता लागलेल्या ‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ कार्यक्रमाचे विशेष प्रक्षेपण रविवार, १० एप्रिल रोजी रात्री ८ वाजता ‘आयबीएन लोकमत’ वाहिनीवरून होणार आहे. विविध विभागांतून निवडण्यात आलेल्या रत्नांचा हा गौरव सोहळा आहे. या रत्नांना महाराष्ट्रभरातून झालेले मतदान आणि मुंबईच्या एनसीपीए सभागृहात झालेला नितांत देखणा सोहळा, त्यासाठी मुंबईसह राज्यभरातून जमलेल्या मान्यवरांची मांदियाळी यामुळे हा कार्यक्रम अविस्मरणीय बनला आहे. या कार्यक्रमात अभिनेता रणवीर सिंग आणि आमीर खान पहिल्यांदा एकत्र आले आणि त्यांनी बहारदार नृत्यही केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या तरुण राजकारण्यांची मुलाखत घेतली, या आधी असे एकाही मुख्यमंत्र्यांनी केले नव्हते. याच समारंभात नीता अंबानी यांना ‘युथ आयकॉन’ पुरस्कार दिला गेला. शंकर महादेवन, आशा भोसले, नाना पाटेकर यांच्या उपस्थितीने रंगलेला हा कार्यक्रम रविवारी रात्री ‘आयबीएन लोकमत’च्या प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Web Title: 'Maharashtrian of the Year' award ceremony today, on 'IBN Lokmat'