महाराष्ट्रीयन आॅफ द इयर पुरस्कार राज्याच्या प्रगतीचा आरसा

By Admin | Updated: March 31, 2016 03:46 IST2016-03-31T03:46:07+5:302016-03-31T03:46:07+5:30

‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ पुरस्कार हा राज्याच्या प्रगतीचा आरसा आहे. नामांकने मिळालेले सगळे मानकरी हे एका अर्थाने विकासदूतच आहेत. महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रांतील रत्नेच ‘लोकमत’ने

Maharashtrian of the Year Award | महाराष्ट्रीयन आॅफ द इयर पुरस्कार राज्याच्या प्रगतीचा आरसा

महाराष्ट्रीयन आॅफ द इयर पुरस्कार राज्याच्या प्रगतीचा आरसा

‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ पुरस्कार हा राज्याच्या प्रगतीचा आरसा आहे. नामांकने मिळालेले सगळे मानकरी हे एका अर्थाने विकासदूतच आहेत. महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रांतील रत्नेच ‘लोकमत’ने वेचली आहेत. त्यांच्या सन्मानातून अखिल मराठी मनाला प्रेरणा मिळणार आहे. या दिग्गजांचे आपापल्या क्षेत्रातील कार्य सकारात्मक आणि प्रेरणादायक असल्याने त्यांच्यापासून स्फूर्ती घेत आणखी असे नामवंत महाराष्ट्रात तयार व्हावेत. समाजशिक्षणाच्या या कार्यात अजिंक्य डी.वाय. पाटील
विद्यापीठ जोडले जातेय, याचा मला मनस्वी आनंद आहे. पारंपरिक शिक्षणाबरोबरच महाराष्ट्र आणि देश घडविला जावा अशा प्रकारचे शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न असतो. समाजप्रबोधनाची वाट चालतानाच सभोवतालच्या घटना-घडामोडींकडेही आमच्या विद्यार्थ्यांनी सजग राहावे, ही आमची भूमिका असते. ‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’च्या महाराष्ट्ररत्नांकडून ते प्रेरणा घेतील, असा मला विश्वसा आहे.
- डॉ. अजिंक्य डी.वाय. पाटील,
अध्यक्ष,
अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठ

Web Title: Maharashtrian of the Year Award