महाराष्ट्राचा सुपुत्र पांडुरंग गावडे काश्मिरात शहीद

By Admin | Updated: May 23, 2016 05:20 IST2016-05-23T05:20:45+5:302016-05-23T05:20:45+5:30

जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात चक द्रुगमुल्ला येथे दहशतवाद्यांशी उडालेल्या भीषण चकमकीत गंभीर जखमी झालेले नायक पांडुरंग महादेव गावडे यांचे रविवारी उपचारादरम्यान निधन झाले.

Maharashtra's son Pandurang Gawade martyr in Kashmir | महाराष्ट्राचा सुपुत्र पांडुरंग गावडे काश्मिरात शहीद

महाराष्ट्राचा सुपुत्र पांडुरंग गावडे काश्मिरात शहीद

श्रीनगर/सिंधुदुर्ग : जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात चक द्रुगमुल्ला येथे दहशतवाद्यांशी उडालेल्या भीषण चकमकीत गंभीर जखमी झालेले नायक पांडुरंग महादेव गावडे यांचे रविवारी उपचारादरम्यान निधन झाले. संरक्षण विभागाने ही माहिती दिली.
महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथील सुपुत्र असलेले पांडुरंग गावडे यांना श्रीनगर येथील लष्कराच्या ९२ बेस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. शनिवारी दहशतवाद्यांसोबत तब्बल नऊ तासांपर्यंत चकमक चालली. या चकमकीत भारतीय जवानांनी सर्व पाचही दहशतवाद्यांना यमसदनी धाडले.
परंतु दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात ४१ राष्ट्रीय रायफल्सचे गावडे व ४७ रायफल्सचे जवान अतुल कुमार
हे जखमी झाले. उपचारावेळी गावडेंचा
मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव आंबोली या मूळ गावी पाठविण्यात येणार आहे. पांडुरंग यांच्यामागे आई-वडील, पत्नी व दोन मुले आहेत.

Web Title: Maharashtra's son Pandurang Gawade martyr in Kashmir