आघाडीच्या दरोडेखोरांनी महाराष्ट्र लुटला : फडणवीस
By Admin | Updated: October 10, 2014 22:55 IST2014-10-10T22:01:44+5:302014-10-10T22:55:06+5:30
पंधरा वर्षात महाराष्ट्रामध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पांढरपेशा दरोडेखोरांनी दरोडा

आघाडीच्या दरोडेखोरांनी महाराष्ट्र लुटला : फडणवीस
दापोली: गेल्या पंधरा वर्षात महाराष्ट्रामध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पांढरपेशा दरोडेखोरांनी दरोडा घातला आहे. येथील शेतकरी कर्जाच्या खाईत अडकला आहे. देशात सीमेवर शत्रूबरोबर युद्ध करताना किंवा आतंकवादाने जेवढी माणसे मारली गेली नसतील त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक म्हणजे तब्बल ६० हजार शेतकऱ्यांनी केवळ महाराष्ट्रात आत्महत्या केल्या. राज्यातील जमीन सिंचनाखाली आणण्यासाठी ७० हजार कोटी रुपयांचे राज्य शासनाने कर्ज घेतले. मात्र, एक टक्काही क्षेत्र सिंचनाखाली आले नाही. हा सारा पैसा या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या दरोडेखोरांनी लुटल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार देवेंद्र फडणवीस यांनी केले.
राज्यावर सध्या ३ लाख कोटी रुपयांचे कर्ज असल्याची माहितीही फडणवीस यांनी दिली. राज्यातील प्रत्येक दिवशी जन्माला येणारे नवजात अर्भकही २७ हजार रुपयांचे कर्ज घेऊनच जन्माला येत असल्याचे ते म्हणाले, एवढे कर्ज घेवूनही राज्याच्या तिजोरीत फक्त उंदीर फिरतात. या सर्व पैशांची राष्ट्रवादी व काँग्रेसच्या दरोडेखांरानी विल्हेवाट लावली आहे असा आरोप त्यांनी केला.
महाराश्ट्रात युवाशक्ती मजबूत आहे. राज्याचे सरासरी आर्युमान २७ वर्षांचे आहे. यात गेल्या १५ वर्षात्र येईल. युवकाला बेरोजगारीच्या खाईत लोटण्याचे काम आघाडी शासनाने केले असल्याचा आरोप करत फडणवीस पुढे म्हणाले की, राज्यामध्ये रोजगार आहे. मात्र प्रशिक्षित उमेदवारांची कमी असल्याने बेरोजगारी वाढली आहे. विद्यमान शिक्षण प्दधतीने केवळ कारकून निर्माण करण्याचेच काम केले. पदवीधर असलेल्या आताच्या युवकाला साधी चपराशाची नोकरीही मिळत नाही. शिक्षणाचेही खाजगीकरण नि व्यापारीकरण होते आहे. युवकांच्या शक्तीला जर मानव संसाधनेत परावर्तीत केले तर राजयाची परिस्थिती नक्कीच बदलू शकते. यासाठी भाजपच्यावतीने तब्बल २ कोटी नवयुवकांना प्रशिक्षित करण्याचे काम हाती घेण्यात आले असल्याची माहितीही आ.फडणवीस यांनी दिली.
या सभेमध्ये मंडणगडचे भाजपचे तालुकाध्यक्ष सचिन थोरे, खेडचे तालुकाध्यक्ष संजय बुटाला, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिायचे सरचिटणीस अजित तांबे, अर्चना येलवे, राहुल जाधव यांची भाषणे झाली.(प्रतिनिधी)