शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Winter Session: शंभूचा चंबू झालाय, भास्कर जाधवांनी डिवचलं; शंभूराज देसाईंनी घेतला समाचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2022 12:35 IST

गेल्या ६ महिन्यात १५ मंत्र्यांना वेगवेगळ्या प्रकरणात क्लीनचीट या सरकारने दिलंय असा आरोप भास्कर जाधवांनी केला.

नागपूर - सीमावादावर तोंड लपवायला जागा सरकारकडे शिल्लक नाही. कारण यांच्या २ मंत्र्यांनी राणा भीमदेवीच्या थाटात सांगितले आम्ही कर्नाटकात जाणार. मग कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दम दिला त्यानंतर चंद्रकांत पाटील गप्प झाले. दुसरा चंबु देसाई यांच्या तोंडाचा चंबू झाला. सकाळ संध्याकाळ शिवसेनेवर बोलणारे शंभु यांचा कर्नाटकबाबतीत चंबू झालाय. त्यामुळे हे सरकार अन्याय करणारे आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला या सरकारकडून काही मिळणार नाही अशा शब्दात ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे. 

भास्कर जाधव म्हणाले की, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटल्याप्रमाणे, जोपर्यंत कर्नाटकमधील मराठी भाषिकांवर न्याय देणारा आणि त्यांच्या हक्कासाठी लढणारा ठराव महाराष्ट्र विधानसभेत येणार नाही तोपर्यंत विधिमंडळाचं अधिवेशन चालू देणार नाही ही विरोधकांची भूमिका आहे आणि त्याबाबत आम्ही सभागृहात आवाज उचलणार आहोत. विदर्भ, मराठवाड्यावर लक्ष द्यायला सरकार तयार नाही. सीमाभागातील मराठी माणसांकडे पाहत नाही असं त्यांनी सांगितले. 

तसेच गेल्या ६ महिन्यात १५ मंत्र्यांना वेगवेगळ्या प्रकरणात क्लीनचीट या सरकारने दिलंय. त्यामुळे हे सरकार भ्रष्टाचार करणार, घोटाळे करणार आणि त्यांना क्लीनचीट देण्याचं कामही सरकार करणार. सत्ताधारी पक्षाचे नेते सत्तेची धमकी देत आहेत. त्याचा अर्थ हे सरकार न्यायबुद्धीने वागणारं नाही. सर्वांना समान न्यायानं वागणूक देणारं नाही असा आरोप भास्कर जाधवांनी केला. 

शंभूराज देसाईंनी घेतला समाचारसभागृहात उद्धव ठाकरे दिसतायेत हे चांगले आहे. विधिमंडळात आल्यानंतर ते ठाकरे गटाच्या कार्यालयात न जाता काँग्रेस कार्यालयातून ते माघारी परतले. आज बऱ्याच दिवसांनी सभागृहात उपस्थित राहतील. राज्याच्या हिताबाबत, धोरणात्मक काही विषय दिशाभूल न करता सभागृहात मांडतील अशी अपेक्षा आहे. संजय राऊतांना आम्ही महत्त्व देत नाही. माझी ५०-५५ वेळा सांगितले त्यांच्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज नाही अशा शब्दात मंत्री शंभुराज देसाई यांनी ठाकरे गटाचा समाचार घेतला आहे. 

शंभुराज देसाई म्हणाले की, संजय राऊत यांचे मानसिक संतुलन बिघडलं आहे. रोज नवीन मुद्दा काढतात आणि भरकटत दुसऱ्या मुद्द्याकडे जातात. नरेश म्हस्के यांच्या विभागात एक दवाखाना आहे त्याठिकाणी राऊतांवर उपचार केले पाहिजेत. माध्यमेच राऊतांकडे लक्ष देतात आम्ही लक्ष देत नाही असं त्यांनी सांगितले.  

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनShambhuraj Desaiशंभूराज देसाईBhaskar Jadhavभास्कर जाधव