शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
3
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
4
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
5
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
6
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
7
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
8
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
9
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
10
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
11
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
12
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
13
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
14
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
15
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
16
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
17
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
18
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
19
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
20
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा

'मुंबई कुणाच्या बापाची नाही, मुंबईवर दावा खपवून घेणार नाही'; सीमाप्रश्नी देवेंद्र फडणवीस आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 13:39 IST

मुंबईला केंद्रशासित प्रदेश जाहीर करा, मुंबई ही कर्नाटकाचीच आहे, अशी वक्तव्ये कर्नाटकातील मंत्री आणि आमदारांनी केली.

नागपूर:कर्नाटककडून सुरू असलेल्या कुरघोडीचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी सीमा भागातील जमीन महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासाठी निर्धाराने लढा देण्याचा ठराव मंगळवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत मंजूर करण्यात आला. दरम्यान, मुंबईला केंद्रशासित प्रदेश जाहीर करा, मुंबई ही कर्नाटकाचीच आहे, अशी वक्तव्ये कर्नाटकातील मंत्री आणि आमदारांनी केली. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटक सरकारला कडक शब्दात सुनावले.

अजित पवारांची सरकारकडे मागणीकर्नाटकातील नेत्यांनी केलेल्या वक्तव्याचे जोरदार पडसाद विधानसभेत उमटले. यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे राज्य सरकारचे लक्ष या मुद्द्याकडे वळवून कर्नाटक सरकारला कडक शब्दात सुनावणारे पत्र पाठवण्याची मागणी केली. महाराष्ट्रात विविध राज्यातील लोक गुण्यागोविंदाने राहतात, त्याचा आपल्याला अभिमान आहे. कर्नाटकातील विधान परिषदेचे आमदार लक्ष्मण सवदी यांनी मुंबई ही कर्नाटकचीच आहे, असे वक्तव्य करून मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले. कर्नाटककडून सीमाप्रश्नाला चुकीचे वळण देण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे अजित पवार म्हणाले.

देवेंद्र फडणवीस सीमाप्रश्नी आक्रमकअजित पवारांच्या मुद्द्याची देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली. जो विषय उपस्थित केला तो महत्त्वाचा आहे. ज्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे बैठक झाली, तेव्हा दोन्ही राज्यांनी नवे दावे न करण्याचे मान्य केले होते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणानुसारच काल आपण ठराव केला आहे. कर्नाटकाच्या मंत्र्यांनी किंवा आमदारांनी किंवा काँग्रेसच्या अध्यक्षांनी केलेले दावे बैठकीशी विसंगत असून पूर्णपणे चुकीचे आहेत, असं देवेंद्र फडणीस म्हणाले.

मुंबई कुणाच्या बापाची नाहीमुंबईवर दावा सांगण्याचा आम्ही निषेध आम्ही करतो. लवकच निषेधाचे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवू. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देऊ. गृहमंत्र्यांसमोर ठरलेल्या गोष्टींचे उल्लंघन करणे दोन्ही राज्याच्या संबंधाबाबत योग्य नाही. मुंबई महाराष्ट्राचीच, ती कुणाच्या बापाची नाही. मुंबईवर दावा सांगणे खपवून घेणार नाही. अमित शहांनी ठरललेल्या गोष्टीचे पालन महाराष्ट्र सरकार करत आहे. त्यामुळे शहांनी कर्नाटकाच्या बोलघेवड्या लोकांना तंबी दिली पाहिजे, असेही फडणवीस म्हणाले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनMaharashtraमहाराष्ट्रKarnatakकर्नाटक