शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

Maharashtra Winter Session 2022: ठाकरे-शिंदे बनले सख्खे शेजारी; शिवसेनेच्या एकाच कार्यालयाचे बनले २ भाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2022 10:31 IST

राज्यात गेल्या जूनमध्ये सत्तांतर झाले. त्यानंतर मुंबईत झालेल्या विधिमंडळ अधिवेशनात देखील शिवसेनेचे कार्यालय शिंदे गटाला की ठाकरे गटाला यावरून वाद पेटला होता.

मुंबई - महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात होत आहे. नागपूरात सुरू होणाऱ्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधाऱ्यांविरोधात विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. महागाई, बेरोजगारी आणि महापुरुषांचा अपमान यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांची कोंडी करणार आहेत. तर सत्ताधारीही विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज आहे. त्यात शिवसेनेच्या २ गटांमध्ये यंदाच्या अधिवेशनात पुन्हा वाद उफाळून येणार आहे. 

नागपूर हिवाळी अधिवेशनानिमित्त शिवसेनेचे ठाकरे-शिंदे गट दोन्ही आमनेसामने येण्याची शक्यता आहे. त्याचं कारण म्हणजे शिवसेनेचे कार्यालय कुणाला द्यायचे असा प्रश्न सगळ्यांना पडला होता त्यावर तोडगा म्हणून आता कार्यालयाचे २ भाग बनवण्यात आले आहे. त्यामुळे एकाच कार्यालयात शिंदे-ठाकरे गटाचे आमदार शेजारी शेजारी बसणार आहेत. 

राज्यात गेल्या जूनमध्ये सत्तांतर झाले. त्यानंतर मुंबईत झालेल्या विधिमंडळ अधिवेशनात देखील शिवसेनेचे कार्यालय शिंदे गटाला की ठाकरे गटाला यावरून वाद पेटला होता. ठाकरे गटाने कार्यालयावर ताबा मिळविला होता. नागपुरातही हाच प्रकार घडला. आपल्या आमदारांना बसण्यासाठी माझे कार्यालय आहे. आपल्या मंत्र्यांची देखील कार्यालय आहेत. त्यामुळे संघर्ष कशाला अशी समजूतदारपणाची भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईच्या अधिवेशनात घेतली होती आणि वाद टाळला होता. तीच भूमिका यावेळी देखील ते घेतील, असं म्हटलं जात होतं. परंतु आता शिवसेनेच्या विधिमंडळ पक्ष कार्यालयाबाहेर २ पाट्या लावण्यात आल्या आहेत. 

शिंदे-ठाकरे गटात वादंगएकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेच्या एकूण ५५ आमदारांपैकी ४० आमदार शिंदे गटात सहभागी झालेत. तर उर्वरित आमदार आजही उद्धव ठाकरेंच्यासोबत आहेत. त्यात विधिमंडळात अद्याप शिंदे गटाला मान्यता देण्यात आली नसल्याने कागदोपत्री उद्धव ठाकरे यांचा गटच अधिकृत मानला जातो. त्यामुळे ठाकरे गटाकडून शिंदे गटावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, १९९० पासून विधानभवन परिसरात शिवसेनेला जे कार्यालय दिले जाते तेच यावेळीही दिले गेले पाहिजे अशी आमची भूमिका आहे. या कार्यालयात आमचे कर्मचारी आजपासूनच रूजू झाले आहेत. कामकाज सुरू केले आहे. हे कार्यालय आमच्याकडेच राहील. शिंदे गटाला मोठे कार्यालय द्या, वाटल्यास महाल द्या पण आम्ही हे कार्यालय सोडणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला होता.  

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे