शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Winter Session 2022 : निवडणुकांवर नजर ठेवत स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी ५,५०० कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2022 07:32 IST

एकूण ५२ हजार ३२७ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सोमवारी विधिमंडळात सादर करण्यात आल्या. 

नागपूर : महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांसह स्थानिक  स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर नजर ठेवत शिंदे- फडणवीस सरकारने तब्बल ५,५०० कोटी रुपयांची तरतूद पुरवणी मागण्यांमध्ये केली आहे. एकूण ५२ हजार ३२७ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सोमवारी विधिमंडळात सादर करण्यात आल्या. 

४ हजार ५०० कोटी रुपये हे महापालिका आणि नगरपालिकेला वैशिष्ट्यपूर्ण विकास  कामांसाठी दिले जातील, तर ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा, तसेच विविध विकासकामांसाठी अतिरिक्त १ हजार  कोटी रुपये मिळणार आहेत. यानिमित्ताने सरकारने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू केल्याचे मानले जाते.

महाराष्ट्र विधिमंडळाच्या इतिहासात इतक्या मोठ्या रकमेच्या पुरवणी मागण्या सादर होण्याची ही पहिलीच वेळ आहे. उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत पुरवणी मागण्या मांडल्या. या मागण्यांवर  येत्या  २१ आणि २२ डिसेंबर रोजी चर्चा, तसेच मतदान होऊन शिक्कामोर्तब  केले जाईल.

कृषी पंपांनाही मदत राज्यातील कृषी पंपधारक शेतकरी, यंत्रमागधारक, वस्त्रोद्योग ग्राहक आणि औद्योगिक ग्राहकांना विद्युत प्रशुल्कात देण्यात येणाऱ्या सवलतींवरचा खर्च भागवण्यासाठी ४,९९७ कोटी रुपये दिले आहेत. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या  मदतीसाठी ३ हजार २००  कोटी रुपये तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रलंबित कांदा अनुदान देण्यासाठी ७ कोटी ४७ लाख रुपयांची तरतूद पुरवणी मागणीत आहे.

प्रोत्साहनपर तरतूदराज्यातील अनुदानित शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाच्या पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याची थकबाकी, तसेच तिसरा हप्ता देण्यासाठी अतिरिक्त २ हजार १३५ कोटी रुपये,  राज्य सरकारी  निवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतन आणि सेवानिवृत्तीचे लाभ देण्यासाठी दोन हजार कोटी,  तसेच लघू, मध्यम, मोठ्या उद्योगांना,  तसेच विशाल प्रकल्पांना प्रोत्साहनपर रक्कम देण्यासाठी दोन हजार कोटी.

पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेतील तूट भरून काढण्यासाठी ८३९ कोटी रुपये, राज्यातील मान्यताप्राप्त अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि जिल्हा परिषद शाळेतील पात्र कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन योजनेच्या अंतर्गत अंशदान देण्यासाठी ७३३ कोटी रुपये, अनुसूचित जमातीच्या लाभार्थींसाठी राबविण्यात येणाऱ्या शबरी आदिवासी घरकुल योजनेसाठी  ६८३ कोटी, पंतप्रधान पीक विमा योजनेच्या अंतर्गत खरीप आणि रब्बी हंगाम प्रलंबित विमा हप्ता अनुदान, तसेच रब्बी हंगाम २०२२-२३ साठी अनुदानाचा पहिला हप्ता विमा कंपन्यांना देण्यासाठी ६३० कोटी रुपये, खरीप हंगाममधील धान खरेदीअंतर्गत प्रोत्साहन साह्य देण्यासाठी अतिरिक्त ५९६ कोटी रुपये. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन