शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

"भाजपा नेत्यांच्या प्रबोधनासाठी मोदींचा संस्थेमधील कलाविष्कार"; नरेंद्र मोदींच्या मिमिक्रीचा व्हिडीओ शेअर करत सचिन सावंतांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2021 17:27 IST

Sachin Sawant : मोदींचा आदर्श विसरलेल्या भाजपा नेत्यांच्या प्रबोधनासाठी मोदींचा संस्थेमधील कलाविष्कार सादर करत आहोत, असे म्हणत सचिन सावंत यांनी भाजपाला टोला लगावला आहे. 

मुंबई : राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरु असून पहिलाच पंतप्रधानांची नक्कल करण्यावरून मोठा गोंधळ उडाला. शिवसेना आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी बोलताना नरेंद्र मोदी यांची काही वाक्ये हिंदीत, नक्कल करून बोलली. त्यानंतर विरोधकांनी गोंधळ घालत भास्कर जाधव यांना माफी मागायला लावली.

दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेस नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक जुना व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला असून त्यामध्ये ते काँग्रेस नेते राहुल गांधी यांची नक्कल करताना दिसत आहेत. तसेच, मोदींचा आदर्श विसरलेल्या भाजपा नेत्यांच्या प्रबोधनासाठी मोदींचा संस्थेमधील कलाविष्कार सादर करत आहोत, असे म्हणत सचिन सावंत यांनी भाजपाला टोला लगावला आहे. 

सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, "विधानसभेत अंगविक्षेप केले असा आरोप करत शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी माफी मागावी अशी मागणी देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्यांनी करून हक्कभंग आणण्याची धमकी दिली. मोदींचा आदर्श विसरलेल्या भाजपा नेत्यांच्या प्रबोधनासाठी मोदींचा संस्थेमधील कलाविष्कार सादर करत आहोत." दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत मोदींवर टीका करताना डोळा मारला होता. तो व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींची नक्कल करत त्यांची खिल्ली उडवली होती. 

काय आहे प्रकरण?पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा उल्लेख करत राज्याचे मंत्री नितीन राऊत आणि आमदार भास्कर जाधव यांनी नक्कल केल्याने विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधी पक्षाचे सदस्य चांगलेच भडकले. विधानसभेत नितीन राऊत यांनी एका विषयासंबंधी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा पैसा बाहेर काढू, नागरिकांना 15-15 लाख रुपये देऊ असे आश्वासन दिले होते, असे वक्तव्य केले. मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या विधानाला आक्षेप घेतला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असे आश्वासन कधीही दिलच नव्हते, असा दावा फडणवीस यांनी केला. या लक्षवेधीशी पंतप्रधानांचा संबंध नसतानाही तो विषय काढणे हे आम्ही सहन करणार नाहीत,  असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यानंतर आमदार भास्कर जाधव उभे राहिले आणि म्हणाले, 2014 साली देशाचे पंतप्रधान होण्यापूर्वी नरेंद्र मोदी म्हणाले होते, काला धन लाने का है की नही लाने का… लाने का… लाने का है तो कहाँ रखने का.. यु ही रखने का..., अशा प्रकारे नक्कल करताना त्यांनी अंगविक्षेपही केला.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आक्रमकभास्कर जाधवांनी सभागृहात पंतप्रधानांची नक्कल केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे तत्काळ निलंबन करण्याची मागणी केली. सभागृहात भास्कर जाधव यांना निलंबित करा, अशा घोषणा सुरु झाल्या. देवेंद्र फडणवीस म्हणाले, सभागृहात देशाच्या पंतप्रधानांची नक्कल सहन केली जाणार नाही. अंगविक्षेप करतायत ते सहन केले जाणार आहे का, ही पद्धत आहे का सभागृहाची? अंगविक्षेप करून भास्कर जाधव जे बोलतायत हे शोभनीय नाही. हे चालत नाही. आम्ही यांच्या नेत्यांचीही अशाच प्रकारे नक्कल केली. हे चालेल का सभागृहाला? त्यांनी माफी मागितली पाहिजे. 

भास्कर जाधव यांनी मागितली माफीविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृह स्थगित करण्याची मागणी केली. त्यानंतर भास्कर जाधव यांनी उभे राहून, या सर्व प्रकरणावर माफी मागितली. भास्कर जाधव म्हणाले की, "मी ते पंतप्रधान असल्याच्या आधी बोललो आहे. पंतप्रधान झाल्यावर असं मी बोललो नाही. मी माझे शब्द मागे घेतो आणि अंगविक्षेप मागे घेतो."

टॅग्स :Sachin sawantसचिन सावंतNarendra Modiनरेंद्र मोदीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसvidhan sabhaविधानसभा