महाराष्ट्राला विजेतेपद
By Admin | Updated: January 13, 2015 00:18 IST2015-01-12T22:17:38+5:302015-01-13T00:18:17+5:30
राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धा : पुरूष-महिला दोन्ही गटांत बाजी; मध्य प्रदेश दुसऱ्या स्थानी

महाराष्ट्राला विजेतेपद
सांगली : बजरंग पकड, बगली अशा थरारक कसरती करून मल्लखांबावर वर्चस्व मिळत महाराष्ट्राच्या पुरूष व महिला दोन्ही संघांनी विजेतेपद पटकावले. अनुभवी मध्य प्रदेशच्या संघास मात्र दुसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले.
पारितोषिक वितरण मिरजेचे आ. सुरेश खाडे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी मनोहर सारडा होते. आ. खाडे म्हणाले, देशी खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक ती मदत मी करेन. मल्लखांब, जिम्नॅस्टिक, अॅक्रोबॅटीक्स आदी खेळांनी सांगलीचे नाव उंचावले आहे. जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक यांनी स्वागत केले़ डॉ़ सुहास व्हटकर व शिवाजी त्रिमुखे यांनी सूत्रसंचालन केले़ शिवाजी सगरे यांनी आभार मानले़ यावेळी मुंबईचे क्रीडाधिकारी सुहास व्हनमाने, महेश पाटील, सुधाकर जमादार, उमेश बडवे, बी़ शंकर, मुन्ना आलासे, प्रशांत पवार, युवराज खटके, उमेश सूर्यवंशी, श्रीकांत कुंभार, अक्रम मुजावर, जुबेर समलेवाले, माया खटके आदी उपस्थित होते़ जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय, सांगली जिल्हा अॅमॅच्युअर मल्लखांब असोसिएशन व तरुण भारत व्यायाम मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ६० व्या शालेय राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, आ. सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ, आ. शिवाजीराव नाईक, आ. विलासराव जगताप, आ. सुरेश हळवणकर आदींनी या स्पर्धेसाठी सहकार्य केले. (क्रीडा प्रतिनिधी)
स्पर्धेचा निकाल व गुण
पुरूष : महाराष्ट्र : प्रथम (४५.३०); मध्य प्रदेश : द्वितीय (४३.३०);
विद्या भारती : तृतीय (१९.६५), गुजरात : चतुर्थ (१८.६५)
महिला : महाराष्ट्र : प्रथम (४४.३५), मध्य प्रदेश : द्वितीय (२९.३५)
विद्या भारती : तृतीय (२९.२०), गुजरात : चतुर्थ (२६.१०)
वैयक्तीक : पुरुष सागर ओहोळकर : महाराष्ट्र : प्रथम (१६.४५), सुशांत पाटील : महाराष्ट्र : द्वितीय (१५.५७), राजवीर पानवार : तृतीय : मध्य प्रदेश (१५.०५), मनिष पानवार : चतुर्थ : मध्य प्रदेश (१४.६२)
वैयक्तिक : महिला, पूनम शर्मा : महाराष्ट्र : प्रथम (१५.३०)
मृणाल सैतवडेकर : महाराष्ट्र : द्वितीय (१५.१५), वैष्णवी जहागीरदार : सीबीएसई : तृतीय (१४.५५), मुस्कान बाकोडीया : मध्य प्रदेश : चतुर्थ (१३.६५).
राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत विजेतेपद मिळवलेल्या महाराष्ट्र संघास आ. सुरेश खाडे यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले. यावेळी जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक, बापू समलेवाले, तानाजी घार्गे, दीपक सावंत, डॉ. सुहास व्हटकर, शिवाजी त्रिमुखे, सुहास व्हनमाने, महेश पाटील, शिवाजी सगरे, आदी उपस्थित होते.